मोठी बातमी! MPSC सचिवांची बदली होणार, तडकाफडकी जीआर निघणार, आंदोलनाला मोठं यश

MPSC secretary transfer : 2 ऑक्टोबरच्या पुण्यातील एमपीससीच्या विद्यार्थीं आंदोलनापूर्वी एक मोठी बातमी समोर आली आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी एमपीएससीचे सचिव यांची बदली करणार असल्याचं आश्वासन विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! MPSC सचिवांची बदली होणार, तडकाफडकी जीआर निघणार, आंदोलनाला मोठं यश
mpsc students protest devendra fadnavis mahendra harpalkar transfer
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 30, 2026 | 6:14 PM

योगेश बोरसे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी: मोठी बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीवस यांची एमपीएससीच्या विध्यार्थीं शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा पार पडली आहे. 2 ऑक्टोबरच्या पुण्यातील एमपीससीच्या विद्यार्थीं आंदोलनापूर्वी ही सकारत्मक चर्चा झाली आहे. एमपीएससी आंदोलन मागण्यावर मुख्यमंत्र्यां सोबत सकारत्मक चर्चा झाली आहे. एमपीएससीचे सचिव महेंद्र होरपाळकर यांची बदली होणार, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बदलीचे आदेश आजच काढले जातील, अशीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

आजच निघणार शासन आदेश?

2 ऑक्टोबर 2026 रोजी एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन पुण्यामध्ये नियोजित केलेलं आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शप गटाचे आमदार रोहित पवारही उपस्थित राहणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून हे आंदोलन राज्यामध्ये चर्चेचत आहे. त्यामुळे मात्र या आंदोलनापूर्वीच विद्यार्थ्यांचं एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेलं होतं. या भेटीमध्ये विद्यार्थ्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा झाली. विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी एमपीएससी आयोगाचे अध्यक्षांचा राजीनामा आहे. याच मागणीच्या पार्श्वभूमिवर 2 ऑक्टोबरला पुण्यात आंदोलन नियोजितपणे होणार आहे. मात्र आज मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा केली आहे. त्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अध्यक्षांचा राजीनामा घेता येणार नाही मात्र सचिवांचा राजीनामा होण्याची शक्यत आहे, असं म्हटलं आहे. त्यामुळे यासंबंधीचा तातडीचा शासन निर्णयही आजच काढला जाण्याचीही शक्यता आहे.

Loading...

आंदोलनावर प्रश्नचिन्ह?

त्यामुळे 2 तारखेला नियोजित असलेलं आंदोलन कदाचित मागे घेण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. कारण यापूर्वीही पुण्यामध्ये विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा काढला होता. त्यावेळीही आमदार रोहित पवार हे उपस्थित होते. यावेळीही एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्यासह इतरही काही मागण्या आयोगापुढे आणि राज्य सरकारपुढे मांडण्यात आल्या होत्या. पण आयोग किंवा राज्य सरकारकडून कोणताही दखल घेण्यात आली नव्हती. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा रोहित पवारांनी आंदोलनाची हाक दिली होती. त्याचवेळी त्यांनी सांगितलं होतं की शिष्टमंडळासोबत चर्चा झाली तर कदाचित आंदोलनाबाबत आम्ही विचार करु असंदेखील रोहित पवारांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता पुढे काय होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us