AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Paydhooni Family Death : ताट, चाकू आणि वाट्या… कलिंगडाने मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी भांडी फॉरेन्सिक लॅबमध्ये, मोठी अपडेट समोर

मुंबईतील डोकडिया कुटुंबाच्या चार सदस्यांचा मृत्यू झिंक फॉस्फाईडमुळे झाल्याचे उघड झाले आहे. रात्री कलिंगड खाल्ल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. या प्रकरणी पोलीस कसून तपास करत असून, कलिंगडमध्ये विषारी रसायन कसे आले हे शोधण्यासाठी कुटुंबातील भांडी फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवली आहेत. अहवालाची प्रतीक्षा आहे.

Paydhooni Family Death : ताट, चाकू आणि वाट्या… कलिंगडाने मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी भांडी फॉरेन्सिक लॅबमध्ये, मोठी अपडेट समोर
डोकडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू
| Updated on: May 21, 2026 | 8:06 AM
Share

एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा, रात्रीची वेळ.. मुंबईतील पायधुनी येथे राहणाऱ्या डोकडिया कुटुंबियांनी नातेवाईकांसोबत जेवण केलं, बिर्याणी खात, हसतखेळत गप्पा मारल्या आणि घरी परतले. थोड्या वेळीने भूक लागली म्हणून त्यांनी उठून मध्यरात्रीच्या सुमारास कलिंगड खाल्लं आणि थोड्याच वेळात होत्याच नव्हतं. पहाटेच्या सुमारास डोकडिया कुटुंबातील चारही सदस्य उलट्या, जुलाबांनी हैराण झाले. त्यांची अवस्था पाहून तातडीने डॉक्टरांना बोलावण्यात आलं, त्यांनी तपासून त्यांना जे.जे. रुग्णालयात हलवलं, पण काही उपयोग झाला नाही. 26 एप्रिलच्या दिवशी एकामागोमाग एक अशा चारही सदस्यांचा मृत्यू झाला आणि अख्खी मुंबई हादरली.

पायधुनीत घडलेल्या या घटनेला आता काही दिवस उलटून गेलेत, मात्र त्याबद्दल तपास अजूनही सुरू असून याप्रकरणाची अद्यापही लोकांमध्ये चर्चा आहेच. चार जणांच्या मृत्यूनंतर पोलिसांकडून या घटनेचा कसून तपास सुरू असून रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत. याच प्रकरणात आता एक नवी अपडेट समोर आली आहे. डोकडिया कुटुंबातील चौघांचाही मृत्यू झिंक फॉस्फाइडनेच झाला, असं जे जे रुग्णालयाच्या अहवालात समोर आलं होतं. त्यादृष्टीने तपास सुरू असून डोकडिया कुटुंबियांच्या घरातील काही भांडी आता फॉरेन्सिक प्रयोगशाळेकडे सोपवण्यात आली आहेत.

चौघांच्या मृत्यूचं गूढ उकलण्यासाठी भांडी फॉरेन्सिक लॅबमध्ये

कलिंगड मधील उंदीर मारण्याच्या विषामुळे डोकाडिया कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष न्यायवैद्यक विभागाने दिला आहे. हा निष्कर्ष निघाल्यानंतर दोन आठवड्यांनी जे.जे. मार्ग पोलिसांनी पायधननी येथील पीडित डोकडिया कुटुंबियांच्या घरी जाऊन तेतील काही भांडी जमा केली. उंदीर मारण्याचे विष आणि बोटांच्या ठशांचे अंश शोधण्यासाठी डोकाडिया कुटुंबाची भांडी न्यायवैद्यक( forensic) प्रयोगशाळेकडे सुपूर्द करण्यात आली आहेत. पोलिसांनी डोकडिया कुटुंबियांच्या घरातून ताट, चाकू आणि वाट्यांसह काही भांडी न्यायवैद्यक विश्लेषणासाठी पाठवली आहेत. मात्र याची तपासणी करून निकाल येण्यासाठी काही दिवस लागतील अशी माहिती न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

करणार विविध चाचण्या

बोटांच्या ठशांसोबतच झिंक फॉस्फाईडचे अंश शोधण्यासाठी या भांड्यांवर विविध प्रकारच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. हे रसायन टरबूजाच्या आत कसे पोहोचलं, ते भांड्याचा वापर करून मिसळलं गेलं किंवा त्यात भेसळ केली गेली होती का?असे अनेक सवाल उपस्थित होत असून त्यासाठी भांड्यांची तपासणी केली जात आहे. लवकरच त्याचे अहवला समोर येतील आणि या चौघांच्या मृत्यूप्रकरणाचं गूढ उलगडण्यास मदत होईल.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ