कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था

दरवर्षी मुंबई व उपनगरातून गणेशोत्सवासाठी (Ganpati festival) कोकणात (Kokan) जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. यंदा ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी काही पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

Mumbai Goa highway Ganpati festival, कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी पर्यायी वाहतूक व्यवस्था

मुंबई : दरवर्षी मुंबई व उपनगरातून गणेशोत्सवासाठी (Ganpati festival) कोकणात (Kokan) जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त असते. यामुळे मुंबई गोवा महामार्गावर (Mumbai Goa highway) भाविकांना (Ganpati festival) मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा (Traffic) सामना करावा लागतो. मात्र यंदा ही वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी (Ganpati Festival In Konkan)काही पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन वाहतूक पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.

रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच सुखकर प्रवासाकरिता खाली दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करावा.  मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-पळस्पे फाटा (एन.एच.48) येथून जाणाऱ्या वाहनांनी कळंबोली-पनवेल बायपास-डी पॉईंट-करंजाळे टोलनाका-पळस्पे फाटा या मार्गाचा वापर करावा. तसंच कळंबोली-वाकण (67.5 कि.मी.) मार्गावरून जाणाऱ्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-खोपोली-पाली-वाकण या मार्गाचा वापर करावा.

दरवर्षीप्रमाणे यंदाही रत्नागिरी-सिंधुदुर्ग या भागात गणेशोत्सवादरम्यान जादा बसेस, वाहने (Special Buses for Ganpati festival)सोडण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-चिपळूण मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-(एनएच-4) सातारा-उंब्रज-पाटण-कोयना नगर-कुंभार्ली घाट-खेर्डी-चिपळूण या मार्गाचा वापर करावा.

तर कळंबोली-हातखंबा मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-(एनएच 4), सातारा-कराड-वाठार-टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर-शाहुवाडी-आंबा घाट-साखरपा-हातखंबा या रस्त्याने जावे.

तसेच कळंबोली-राजापूर मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून सातारा-कराड-वाठार-टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर-शाहुवाडी-आंबा घाट-लांजा-राजापूर या मार्गाने जावे.

कळंबोली-कणकवली या रस्त्याऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरुन-कळे-गगनबावडा घाट-वैभववाडी-कणकवली या रस्त्याचा वापर करावा.

त्याशिवाय सावंतवाडीला जणाऱ्या वाहनांनी कळंबोली-सावंतवाडी ऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेमार्गे सातारा-कराड-कोल्हापूर-निपाणी-आजरा-आंबोली घाट-सावंतवाडी या रस्त्याचा वापर करावा.

इतकंच नव्हे तर या दरम्यान महामार्गावर येणाऱ्या अडचणी व इतर मदतीसाठी महामार्ग पोलिसांची वेबसाईट www.highwaypolice.maharashtra.gov.in ला संपर्क साधावा. तसेच 9833498334 व 9867598675 या हेल्पलाईन क्रमांक व संक्षिप्त संदेश सेवासाठी (SMS) 9503211100 व 9503511100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *