AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत अग्नितांडव! मोबाईल अन् प्लास्टिक गोदामाला भीषण आग, रात्री अनेकांची धावाधाव

मुंबईत रात्री अग्नितांडव पाहायला मिळालं. ग्रँडरोडमध्ये मोबाईल आणि प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. आगीच्या घटनेमुळे रात्री अनेकांची धावाधाव झाली.

मुंबईत अग्नितांडव! मोबाईल अन् प्लास्टिक गोदामाला भीषण आग, रात्री अनेकांची धावाधाव
fire briage newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Sep 06, 2026 | 8:01 AM
Share

मुंबईत दोन दिवसांपूर्वी गोरेगाव मेट्रो स्टेशनच्या बेस्ट बसला भीषण आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता ग्रँडरोड भागात आगीची दुर्घटना घडली आहे. ग्रँडरोड भागात शनिवारी (5 सप्टेंबर) रात्री भीषण आगीची घटना घडली. ग्रँडरोडमधील गोदामाला शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले.

आगीत अडकलेल्या नागरिकांची सुटका 

मुंबईतील ग्रँड रोडमध्ये असलेल्या मोबाईल ॲक्सेसरीज आणि प्लास्टिक गोदामाला भीषण आग लागली. गोदामाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले. या आगीत अडकलेल्या 8 ते 10 जणांची सुटका करण्यात आली आहे. गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. ​ ग्रँडरोड पूर्व येथील राजेंद्रसूरी आराधना भवन संचालित जिनशासन राजेंद्र चॅरिटेबल ट्रस्टमधील मोबाईल ॲक्सेसरीज आणि प्लस्टिक गोदामाला रात्री 11:30 वाजता शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली होती.

सात तासानंतर आगीवर मिळवलं नियंत्रण 

गोदामाला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यास अग्निशमन दलाला सात तासानंतर यश आलं. मात्र सात तासानंतर पुन्हा एकदा गोदामामध्ये असलेले फर्निचर धुमसत होते. त्याचा धूर आकाशाकडे जात होता. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानाने पाणी मारून पूर्णपणे आग विझविली. दोन मजली जुने बांधकाम होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात लाकडाचा वापर करण्यात आला होता. आगीमुळे सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या आगीत पूर्णपणे सामान जळून खाक झालं आहे.

गोरेगावमध्ये बेस्ट बसला आग

दोन दिवसांपूर्वी गोरेगावच्या मेट्रो स्टेशनखाली उभ्या असलेल्या बेस्ट बसला आग (Fire) लागल्याची घटना घडली. मेट्रो स्टेशनच्या खालीच ही दुर्घटना घडली. बसला अचानक आग लागल्याने परिसरात एकच धुराचे लोट निर्माण झाले. या आगीमुळे संपूर्ण मेट्रो स्टेशनमध्ये धुराचे लोट पसरले. या धुरामुळे प्रवाशांना श्वास घेण्यासही अडचणी येऊ लागल्या होत्या. धुरामुळे सर्व प्रवासी तातडीने मेट्रो स्टेशनच्या बाहेर आले. बसने अचानक पेट घेतल्याने परिसरात एकच गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...