AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक पदाची परीक्षा रद्द, लवकरच जाहीर होणार नवी तारीख

मुंबई हायकोर्ट लिपिक भरतीची टायपिंग परीक्षा तांत्रिक बिघाडामुळे रद्द केली आहे. या परीक्षांची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाची लिपिक पदाची परीक्षा रद्द, लवकरच जाहीर होणार नवी तारीख
High Court Clerk Exam Row
| Updated on: Aug 29, 2026 | 9:57 PM
Share

मुंबई उच्च न्यायालयाने लिपिक पदाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. लिपिक परीक्षेतील तांत्रिक घोळामुळे राज्यभरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर संभाजीनगर येथे  जाऊन सीजेपीचे नेते अभिजीत दिपके यांनी या आंदोलकांची भेट घेतली होती. त्यामुळे अभिजीत दिपके यांच्या आंदोलनाचे हे यश म्हटले जात आहे. या परीक्षांची नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

बॉम्बे उच्च न्यायालयातील लिपिक पदासाठी आयोजित करण्यात आलेल्या संगणक टायपिंग परीक्षेत राज्यभरातील विविध परीक्षा केंद्रांवर सर्व्हर डाऊन, की-बोर्ड, माऊस न चालणे आणि सिस्टीम अचानक लॉगआउट होणे अशा गंभीर तांत्रिक त्रुटी समोर आल्या होत्या.

कल्याण, छत्रपती संभाजीनगर, वाशीम आणि नांदेड यांसारख्या केंद्रांवर परीक्षा सुरू होताच काही मिनिटांतच सॉफ्टवेअरमधील बिघाडामुळे उमेदवार नापास दाखवले गेले. यामुळे संतापलेल्या उमेदवारांनी परीक्षा केंद्रांबाहेर तीव्र निदर्शने करीत फेर मागणी केली होती. या आंदोलकांना सीजेपीचे नेते अभिजीत दीपके यांनी भेटून संभाजीनगरात ठिय्या आंदोलन केले होते.

या तांत्रिक बिघाड आणि सावळागोंधळ आणि उमेदवारांनी राज्यातील अनेक परीक्षा केंद्रावर निदर्शने केली होती.  या आंदोलनाची दखल  हायकोर्ट प्रशासनाने  घेतली. सुरुवातीला प्रशासनाने  परीक्षा सुरळीत पार पडल्याचे सांगतले होते. मात्र, तांत्रिक त्रुटींची पाहणी करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन नंतर प्रशासनाने दिले होते.

तांत्रिक गैरसोयीमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित परीक्षा रद्द करण्यात आली असून, उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आता लवकरच नवी तारीख आणि सुधारित वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केले जाणार आहे.

रोहित पवार यांची पोस्ट –

उच्च न्यायालयाच्या लिपिक भरतीसाठी घेण्यात आलेल्या टायपिंगच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले होते.  त्यानंतर आपण उच्च न्यायालयाचे महानिबंधक मुनगंटे साहेब आणि महाधिवक्ता मिलिंद साठे साहेब यांची भेट घेऊन त्यांच्याकडे संबंधित परीक्षेची टायपिंग टेस्ट रद्द करण्याची विनंती केली होती असे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी समाजमाध्यमावर पोस्ट करीत म्हटले आहे.

त्यानुसार 16 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेली ही टायपिंग टेस्ट रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबद्दल माननीय न्यायालयीन प्रशासनाचे आभार. झालेल्या परीक्षेतील गैरप्रकाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि नव्याने घेण्यात येणारी टायपिंग टेस्ट स्वतंत्र आणि पारदर्शक पद्धतीने घेतली जावी, ही विनंती असेही रोहित पवार यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.

Follow Us
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा