Mumbai Local Updates : महिला दिनासाठी रविवारी बाहेर पडायचा प्लान ? मुंबईकरांनो आधी हे वाचाच, कोणत्या मार्गांवर ब्लॉक ?

मुंबईकरांच्या लाइफलाइन असलेल्या लोकल रेल्वेच्या देखभालीसाठी रविवारी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रुळांची दुरुस्ती व सिग्नल यंत्रणेतील कामांसाठी हा ब्लॉक माटुंगा ते मुलुंड (मध्य) आणि कुर्ला ते वाशी (हार्बर) या मार्गांवर असेल. प्रवाशांनी वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Mumbai Local Updates : महिला दिनासाठी रविवारी बाहेर पडायचा प्लान ? मुंबईकरांनो आधी हे वाचाच, कोणत्या मार्गांवर ब्लॉक ?
मुंबई लोकल
| Edited By: | Updated on: Mar 07, 2026 | 8:58 AM

रेल्वे म्हणजे मुंबईकरांची लाइफलाईन, रोज लाखो प्रवासी काम, शिक्षण, पर्यटन या निमित्ताने मुंबईतील तिन्ही मार्गांवरील लोकलचा वापर करत असतात. अविरत धावणाऱ्या या लोकल इमानेइतबारे आपलं काम करत लाखो प्रवाशांचा भार वाहून नेतात. मात्र या लोकलनाही विश्रांतीची , देखभालीची गरज असतेच ना. हेच लक्षात घेऊन मुंबईत लोकल मार्गांवर वेळोवेळी दुरूस्तीची काम हाती घेण्यात येतात आणि त्यासाठी रेल्वे मार्गांवर ब्लॉकही घेतला जातो. आजही मुंबईकर, लोकल रेल्वे प्रवाशांसाठी अशीच एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. रेल्वेमार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक कामांसाठी रविवारी रेल्वेच्या दोन मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

रविवार सुट्टीचा, नव्हे मेगाब्लॉकचा

रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक काम पूर्ण करायची असल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर ब्लॉक घेण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनातर्फे घेण्यात आला आहे, त्यानुसा रविवारी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर हा ब्लॉक होणार आहे. तसेच हार्बर रेल्वे लाईनवर, कुर्ला ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मुंहईतील तिसरी रेल्वे लाईन अर्थात पष्चम रेल्वे मात्र सुरळीत धावणार असून या मार्गावर रविवारी कोणताही ब्लॉक नसेल असे स्पष्ट करण्यात आलं आहे.

कधी असेल मेगाब्लॉक ?

मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी 11.20 ते दुपारी 3.45 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून सुटणाऱ्या जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तर ठाण्यानंतर या लोकल पुन्हा जलद मार्गावर वळवण्यात येतील.

तर हार्बर रेल्वे मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. परिणामी सीएसएमटी ते पनवेल आणि वाशी दरम्यान सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील लोकल आणि पनवेल व बेलापूर/वाशी येथून सीएसएमटीकडे सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. ब्लॉक काळात सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी विभागात विशेष उपनगरी लोकल चालवण्यात येतील. त्यामुळे रविवारी बाहेर पडायचं असेल तर आधी वेळापत्रक पहा मगच प्लान करा.

Follow Us