मराठा क्रांती मोर्चाचा आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आक्रोश’, संभाजीराजे छत्रपती सहभागी होणार

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. स्थगितीनंतर आतापर्यंत राज्य सरकारनं कुठलंही पाऊल उचललं नाही, असा आरोप करत आज मराठा क्रांती मोर्चाकडून वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीही या आंदोलनात सहभाग नोंदवणार आहेत.

मराठा क्रांती मोर्चाचा आज वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर 'आक्रोश', संभाजीराजे छत्रपती सहभागी होणार
Follow us
| Updated on: Oct 26, 2020 | 7:58 AM

मुंबई: मराठा क्रांती मोर्चातर्फे आज वांद्रे इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन करण्यात येणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपतीही या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शनिवारी मराठा क्रांती मोर्चानं घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली होती. मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यानंतर गेल्या दीड महिन्यात सरकारनं कुठलंही पाऊल उचललं नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चानं केला आहे. (Maratha Kranti Morcha andolan at bandra collector office)

आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीनंतर सरकारनं कुठलीच पावलं उचलली नाहीत. त्यामुळं मराठा समाजातील विद्यार्थी, तरुणांना शिक्षण आणि नोकरीतील संधींपासून वंचित राहावं लागत आहे. राज्य सरकारनं आधी १२ हजारांची पोलील भरती जाहीर केली आणि आता ऊर्जा खात्यात 9 हजार पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान, आरक्षणाअभावी या भरती प्रक्रियेत मराठा समाजाला स्थान मिळणार नसल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येतोय. मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत राज्य सरकारनं कुठल्याही प्रकारची नोकरभरती करु नये अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे.

दरम्यान, मराठा आरक्षण प्रश्नावर २७ ऑक्टोबरला सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल कऱण्यात येणार आहे. या याचिकेबाबत काय तयारी करण्यात आली आहे, याबाबतही माहिती देण्यात येत नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाकडून करण्यात येत आहे.

‘यापुढे आंदोलनं तीव्र असतील!’ 

मराठा आरक्षणाचा प्रश्न कोर्टात मार्गी लागत नसेल तर राज्य सरकारनं मराठा समाजासाठी संपूर्ण पर्यायी व्यवस्था उभी करावी, अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. तसंच आतापर्यंत १८ ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करुन ठिय्या आंदोलन केलं गेलं. पण यापुढे आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाकडून सरकारला देण्यात आला आहे.

संबंधित बातम्या :

मराठा क्रांती मोर्चाचं मोठं पाऊल, मुख्यमंत्र्यांकडे पोहोचलं रक्ताने सह्या केलेलं पत्र

‘प्रकाश आंबेडकर मुर्दाबाद’, राजेंवरील टीकेनंतर मराठा क्रांती मोर्चात संताप, तुळजापुरात घोषणाबाजी

Maratha Kranti Morcha andolan at bandra collector office

Non Stop LIVE Update
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.