AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Mhada Lottery 2026 : मुंबईत म्हाडाच्या 2640 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर, अर्ज करण्यासाठी नियम काय? प्रक्रिया काय?

गेल्या अनेक दिवसांपासून मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या सोडतीची प्रतीक्षा लागली होती. या घरांसाठी जाहिरात कधी निघेल याची सगळेजण वाट पाहात होते. दरम्यान, आता मुंबईत म्हाडाने 2640 घरांसाठी जाहिरात काढली आहे.

Mumbai Mhada Lottery 2026 : मुंबईत म्हाडाच्या 2640 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर, अर्ज करण्यासाठी नियम काय? प्रक्रिया काय?
Mumbai Mhada Lottery 2026Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 29, 2026 | 6:40 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील कन्नमवार नगर-विक्रोळी, पत्राचाळ सिद्धार्थ नगर-गोरेगाव, जुने मागाठाणे-बोरीवली, गोराई-बोरीवली, सुभाष नगर-चेंबुर, गांधीनगर- वांद्रे, पंतनगर-घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपरी-पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर-दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा आदी गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटातील २६४० सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला दि. ३० मार्च, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपासून प्रारंभ होणार आहे. या सोडतीची जाहिरात दि. ३० मार्च, २०२६ रोजी राज्यातील विविध वृत्तपत्रांत तसेच म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून सदनिका सोडत प्रक्रियेबाबत माहिती देणारी पुस्तिका संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी व अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते सोमवारी, दि. ३० मार्च, २०२६ रोजी ‘गो लाईव्ह’ समारंभाद्वारे प्रारंभ केला जाणार आहे. यानंतर सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची लिंक मंडळाद्वारे दुपारी ०३.०० वाजेपासून उपलब्ध राहील. तसेच नोंदणीकृत अर्जदार देखील ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक २९ एप्रिल, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे. तसेच ऑनलाईन अनामत रकमेची स्विकृती दिनांक ३० एप्रिल, २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत केली जाणार आहे. आरटीजीएस/एनईएफटीद्वारे दि. ३० एप्रिल, २०२६ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेत अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे.

सोडतीसाठी प्राप्त अर्जाची प्रारूप यादी दिनांक ०५ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाईन दावे व हरकती दाखल करण्यासाठी दिनांक ०८ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिद्धी दिनांक १२ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत केली जाणार आहे. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांची अंतिम यादी दि. १२ मे, २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. दि. १५ मे, २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता सोडत काढली जाणार असून सोडतीचे ठिकाण मंडळातर्फे नंतर जाहीर केले जाईल.

मुंबई मंडळाच्या सन २०२६ च्या सोडतीत अत्यल्प उत्पन्न गटासाठी (Economically Weaker Section) १४५ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी (Lower Income Group) ८५८ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी (Middle Income Group) १४०८ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी (Higher Income Group) २२९ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीत म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे बांधकाम सुरू असलेल्या १७६२ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त ३७१ सदनिका, विकास नियंत्रण नियमावली ३३ (७) अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock)म्हणून म्हाडाला प्राप्त १८८ सदनिका तसेच मुंबई मंडळाच्या मागील सोडतींमधील विविध कारणांमुळे रिक्त राहिलेल्या विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून विकासकांकडून गृहसाठा (Housing Stock) म्हणून म्हाडाला प्राप्त व मंडळाच्या विखुरलेल्या ३१९ सदनिकांचा सोडतीत समावेश आहे. विकास नियंत्रण नियमावली ३३ (५), ३३ (७) व ५८ अंतर्गत विकासकांकडून प्राप्त सदनिका ‘जशा आहे त्या स्थितीमध्ये’ विक्रीकरिता उपलब्ध आहेत.

म्हाडा मुंबई मंडळाच्या सोडतीत सहभागी होण्याकरिता IHLMS 2.0 ही संगणकीय आज्ञावली अर्जदार अँड्रॉइड (android) अथवा आयओएस (ios) या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमवर अनुक्रमे गूगल ड्राइव्हच्या प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरमध्ये Mhada Housing Lottery System या नावे मोबाइल अॅप उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तसेच अर्जदारांच्या सोयीकरिता https://housing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर देखील अर्ज नोंदणी, अर्ज भरणा व पेमेंट प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्यापूर्वी अर्जदारांनी या मार्गदर्शनपर माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे.

अर्जदारांना नोंदणीसाठी व अर्ज भरण्यासाठी मोबाईल क्रमांक (आधार क्रमांकाशी संलग्न) व ई-मेल आय.डी. आवश्यक आहे. अर्जदारांना नोंदणीसाठी व पात्रतेसाठी १) आधार कार्ड, २) पॅन कार्ड, ३) अर्जदाराने जाहिरात प्रसिध्द झाल्यापासून मागील सलग २० वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या कोणत्याही भागामध्ये अर्जदारांचे किमान १५ वर्ष सलग वास्तव्य असल्याबाबतचे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्रातील अधिवासाचे प्रमाणपत्र (Domicile Certificate),४) उत्पन्नाचा पुरावा म्हणून दि. ०१.०४.२०२४ ते ३१.०३.२०२५ (उत्पन्नाच्या पुराव्यासाठी आयकर विवरण पत्र अथवा तहसिलदार यांनी दिलेला वार्षिक उत्पन्नाचा दाखला ग्राहय धरला जाईल) आवश्यक आहे. या सोडतीमध्ये समाविष्ट होण्याकरिता अत्यल्प उत्पन्न गटासाठी रुपये सहा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. अल्प उत्पन्न गटासाठी रुपये नऊ लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे.

मध्यम उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखापर्यंत वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा आहे. उच्च उत्पन्न गटासाठी रुपये बारा लाखांहून अधिक वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणार्यांउचा समावेश असणार असून या गटासाठी कमाल मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. अत्यल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. अल्प उत्पन्न गटातील व्यक्ती अल्प व मध्यम उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. मध्यम उत्पन्न गटातील व्यक्ती मध्यम व उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात. उच्च उत्पन्न गटातील व्यक्ती केवळ उच्च उत्पन्न गटासाठी अर्ज करू शकतात.

Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड