रेल्वेचा नवा विक्रम, नऊ महिन्यात फुकट्यांकडून 260 कोटींची वसुली

रेल्वेकडून मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल (Mumbai Railway Earn big amount by without ticket traveler) केला जातो.

Mumbai Railway Earn big amount by without ticket traveler, रेल्वेचा नवा विक्रम, नऊ महिन्यात फुकट्यांकडून 260 कोटींची वसुली

मुंबई : रेल्वेकडून मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून दंड वसूल (Mumbai Railway Earn big amount by without ticket traveler) केला जातो. पण यंदा रेल्वेकडून जमा झालेल्या दंडाचे आकडे आश्चर्यकारक आहेत. मध्य रेल्वेकडून 155 केटी आणि पश्चिम रेल्वेकडून 104 कोटी दंड जमा झालेला आहे. हे दोन्ही मिळून एकूण जवळपास 260 कोटींची रक्कम रेल्वेकडे जमा झालेली आहे. विशेष म्हणजे रेल्वेचा हा नवा विक्रम (Mumbai Railway Earn big amount by without ticket traveler) झाला आहे.

बॉलिवूडमध्ये प्रमोशन करुन सुद्धा एखाद्या चित्रपटाला एवढी कमाई होत नाही, तेवढी कमाई मुंबई रेल्वे विभागातर्फे नऊ मिहन्यात झाली. एप्रिल 2019 ते डिसेंबर 2019 या कालावधीत विना तिकीट प्रवास करणाऱ्यांकडून रेल्वेने जवळपास 260 कोटी रुपये वसूल केले आहेत.

मध्य रेल्वेत विना तिकीट आणि अनियमित तिकीट प्रवासाचे 29.89 लाख गुन्हे दाखल आहेत. यातून रेल्वेने 155 कोटींचा दंड वसूल केला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही रक्कम 10.50 टक्के अधिक आहे. तर पश्चिम रेल्वेमध्ये विना तिकीट आणि अनियमित तिकीट प्रवास करणाऱ्या 21.33 लाख गुन्हे दाखल झाले आहेत. यामध्ये पश्चिम रेल्वेने 104.10 कोटींचा दंड वसूल केला आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा 8.85 टक्के अधिक दंड वसूल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वे मार्गावर प्रत्येक दिवशी जवळपास 45 लाख तर पश्चिम रेल्वेवर जवळपास 35 लाख प्रवाशी प्रवास करत असतात. दरवर्षी वाढत विना तिकीट करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दंडाची रक्कम वाढत आहे.

एवढ्या कमी कालावधीत कोटी रुपयांचा दंड वसूल झाल्यामुळे रेल्वे विभागही खूश आहे. याचे सर्व श्रेय हे रेल्वे टीसी यांना दिले जात आहे. तसेच विना तिकीट प्रवास करणाऱ्यांच्या विरोधात रेल्वेची मोहिम सुरु राहणार आहे. त्यामुळे सर्वांना तिकीट घेऊन प्रवास करावा, असं आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आलं आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *