विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, मुख्यमंत्र्यांकडून संविधानाचे धडे; मुंबई महापालिका शाळांमध्ये विशेष उपक्रम

Playgrounds and Cycling Track For Student: मुंबईतील शाळकरी मुलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. खेळाची मैदानं आणि सायकल ट्रॅक तयार करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक, मुख्यमंत्र्यांकडून संविधानाचे धडे; मुंबई महापालिका शाळांमध्ये विशेष उपक्रम
| Updated on: Oct 16, 2026 | 5:16 PM

मुंबईतील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये सुजाण नागरिक सक्षम भारत उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नागरिक अभ्यासक्रमाचा शुभारंभ पार पडला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनमूल्यांवर आधारित अभ्यासक्रमाचा शुभारंभ करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उपस्थिती लावली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शालेय मुलांसोबत संवाद साधला. यानंतर मुलांसाठी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत.

महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुलांना संविधानाचे धडे दिले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विद्यार्थ्यांना पुस्तकातील धडा वाचून दाखवला. यानंतर त्यांच्याशी संवाद साधल्याचे दिसून आले आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुलभूत कर्तव्ये आणि अधिकार समजून घ्या. बाबासाहेब आंबेडकरांनी विषमतेशी संघर्ष केला आहे. बाबासाहेबांनी मनात कटुता न आणता संविधान तयार केले आहे, असं ते म्हणाले. यानंतर त्यांनी मुलांसाठी मोठी खुशखबर दिली आहे.

Loading...

ते म्हणाले की, राज्य सरकार मुंबईत खेळासाठी मैदान उपलब्ध करून देणार आहे. मुलांसाठी सायकल ट्रॅक तयार करण्यात येणार आहेत, अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. यामुळे आता मुंबईतील मुलांना दिलासा मिळाला आहे. फडणवीस म्हणाले की, मी मुंबई महापालिकेचे अभिनंदन करतो. सुंदर उपक्रमाची सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण देताना उद्याचा नागरिक घडला पाहिजे. जगभरातील माहिती विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन माध्यमातून प्राप्त होते. त्यांचे व्यक्तिमत्व या माहितीमधून तयार होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक हुशार पिढी देशात तयार करत आहोत. पण उत्तम नागरिक म्हणून आपले अधिकार आणि संवेदनशीलता तयार केली नाही तर शिक्षित तयार करू. पण ती समाजाला प्रेरक नसेल समाजाप्रती आपले कर्तव्ये आहे. याचे भान राहिले नाही तर देशाला आवश्यक प्रगती गाठू शकणार नाही. स्मार्ट नागरिक घडवायचे म्हणजे त्यांना आपले अधिकार आणि कर्तव्ये माहिती आहेत. जीवनात काही तरी केले त्यासाठी समाजाने तयार केलेली व्यवस्था आहे. याची जाण असलेली पिढी तयार करावी लागेल. त्यासाठी काही मूल्य पिढीमध्ये रुजवली पाहिजे. ही तीच संविधानिक मूल्य आहेत.

बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली मूल्य अंगीकारली तर विकसित भारताचे सारथी म्हणून आम्हाला काम करता येईल. जीवनात ही मूल्य समजलेले कधीही अपयशी होऊ शकत नाही. अशा विचारातून विद्यार्थी प्रेरणा व स्मार्ट नागरिक ही संकल्पना मांडली आहे. भारताचे संविधान असे आहे, ज्याने भविष्याचा वेध घेतला आहे. बदलत्या काळासाठी साजेसे आहे. 100 वर्षानंतर ही ते साजेसे राहील.संविधानाने दिलेले तत्व आणि मूल्य ही कधीही कालातित होऊ शकत नाही. जगातील सर्व संविधानाचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. पण या मातीतील मूल्य समजून संविधान तयार केले. त्यामुळे भारताचा प्रगतीत सर्वात मोठे उपकरण हे संविधान आहे. म्हणून मोदीजी म्हणाले कुठल्याही धर्मग्रंथ यापेक्षा मोठे संविधान आहे. आपण मानवतेची तत्व विसरलो म्हणून 1 हजार वर्ष गुलामगिरीत राहिलो. आज संविधानाने ती समानता प्रस्थापित करून दाखविली, अस फडणवीस म्हणाले आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us