AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चाकरमान्यांसाठी खुशखबर, मुंबई-गोवा मार्गाचे विघ्न टळणार, एक मार्गिका गणपतीपूर्वीच सुरु होणार

गणपतीच्या आधी मुंबई ते गोवा मार्गाची एक मार्गिका तयार करण्यात येणार आहे. तर सहा ते आठ महिन्यात या महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरु करण्याचा प्रयत्न आहे.

चाकरमान्यांसाठी खुशखबर, मुंबई-गोवा मार्गाचे विघ्न टळणार, एक मार्गिका गणपतीपूर्वीच सुरु होणार
mumbai to goa parshuram ghat Image Credit source: courtesy : @Sahilinfra2
| Updated on: Jul 20, 2023 | 1:58 PM
Share

मुंबई : गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. गणपती उत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मुंबई ते गोवा महामार्गाची ( Mumbai-Goa Highway ) एक सिंगल लेन सुरु केली जाणार आहे. कोणत्याही परिस्थितीत गणेशोत्सवाच्या आधी ही लेन तयार केली जाणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांची ( Konkan Railway )  भलीमोठी प्रतिक्षा यादी ( Railway Waiting List ) हाती पडलेल्या चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. आता रस्ते मार्गाने एसटी ( MSRTC ) आणि खाजगी वाहनांसाठी गोवा महामार्ग फायदेशीर ठरणार आहे.

दरवर्षी चाकरमानी गणपतीच्या सणाला कोकणात आपल्या गावी जात असतात. यंदा गणपतीसाठी मध्य आणि कोकण रेल्वेने तब्बल 208 रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. परंतू बहुतांशी प्रवाशांच्या हाती वेटींगची तिकीटे पडली आहेत. मुंबई ते गोवा महामार्गाचे काम गेली अनेक वर्षे रखडले आहे. यंदा 19 सप्टेंबरला गणपतीचे आगमन आहे. निदान या तारखेपर्यंत तरी मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 ची एक लेन सुरु करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी केली आहे.

हेच ते ट्वीट पाहा…

मुंबई ते नागपूर हा राज्यातील सर्वात मोठी एक्सप्रेसवे तयार झाला तरी मुंबई ते गोवा महामार्ग पूर्ण झाला नसल्याची टीका मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कालच केली होती. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज या महामार्गाच्या कामाची पाहणी केली. या महामार्गाची एक मार्गिका गणपती पूर्वी सुरु करण्यात येईल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. मुंबई ते गोवा महामार्गाचे काम परशूराम घाटात सुरु आहे. या रस्त्याची लांजा ते राजापूर दरम्यान पावसाने आणखी दयनीय अवस्था झाली आहे. सहा ते आठ महिन्यात या महामार्गाच्या दोन्ही मार्गिका सुरु करण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री चव्हाण यांनी म्हटले आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...