AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Megablock : वीकेंडला फिरायला पडताय बाहेर ? मेगाब्लॉकची वेळ तपासली का, नाहीतर अडकाल !

मुंबईकरांनो लक्ष द्या! रविवार, शनिवार मध्यरात्रीपासून मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर आणि पश्चिम मार्गांवर मेगाब्लॉक असेल. दुरुस्ती व देखभालीसाठी घेण्यात येणाऱ्या या ब्लॉकमुळे रेल्वे सेवा विस्कळीत होणार आहे. काही लोकल रद्द होतील तर काही वळवण्यात येतील. प्रवासाला निघण्यापूर्वी वेळापत्रक तपासा आणि प्रवासाचे नियोजन करा.

Mumbai Megablock : वीकेंडला फिरायला पडताय बाहेर ? मेगाब्लॉकची वेळ तपासली का, नाहीतर अडकाल !
रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर असेल ब्लॉक
| Updated on: Apr 18, 2026 | 8:38 AM
Share

लाखो मुंबईकरांची जीवनवाहिनी अर्थात लाइफलाइन असलेल्या रेल्वेतून रोजचा प्रवास करणारे अनेक आहेत. ऑफीस, शाळा, कॉलेजेस, कामासाठी बाहेर पडणारे लाखो मुंबईकर रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गांवरून निर्धोक प्रवास करत असतात. मात्र याच रेल्वेच्या दुरूस्तीसाठी तसेच देखभालीसाठी वेळोवेळी मेगाब्लॉक घेतला जातो. सध्या शाळांच्या परीक्षा संपून सुट्ट्यांचा मौसम आहे, त्यामुळे अनेक जण फिरायला, हुंदडायला बाहेर पडण्याचा प्लान करतात. वीकेंडला तर फिरायला जाणाऱ्यांची खूप गर्दी असते. वीकेंड पाहून तुम्हीही बाहेर पडायच्या विचारात असाल तर थांबा.. हे आधी वाचा ! कारण मुंबई लोकलच्या मध्य, हार्बर रेल्वेवर रविवारी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक

मध्य रेल्वेवरील ठाणे आणि डोंबिवली येथील फलाट विस्तारासाठी, अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्रकालीन विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे शनिवारी शेवटची सीएसएमटी- खोपोली लोकल रात्री 10.28 वाजता असेल. तर ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक 3 व 4 च्या विस्तारासाठी आणि डोंबिवली स्थानकावरील फलाट 1 ए,1 आणि 2 च्या विस्तारासाठी डाऊन आणि अप धीम्या मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक शनिवारी मध्यरात्री 12 वाजल्यापासून सुरू होईल. तो रविवारी सकाळी 10 पर्यंत सुरू असेल.

तसेच मुलुंड – ठाणे आणि दिवा डोंबिवलीदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर ब्लॉक असेल. शनिवारी रात्री ११.२६ ते रात्री ११.५२ आणि रात्री ३.२३ ते सकाळी ९.५५ या वेळेत कल्याणहून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल सेवा कल्याण येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे या लोकल ठाकुर्ली आणि कोपर स्थानकांवर थांबणार नाहीत.

हार्बर मार्गावरही असेल मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील पनवेल – वाशी विभागांदरम्यानच्या हार्बर मार्गावर; तसेच पनवेल आणि ठाणे विभागांदरम्यानच्या ट्रान्स हार्बर मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेण्यासाठी रविवार मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पनवेल येथून सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील हार्बर सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत पनवेल/बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

ट्रान्स हार्बर मार्ग वर पनवेल – ठाणे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 10.01 ते दुपारी 3.53 दरम्यान ब्लॉक असेल पनवेल येथून सकाळी 11.02 ते दुपारी 3.53 दरम्यान ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या अप मार्गावरील ट्रान्स-हार्बर सेवा आणि ठाणे येथून सकाळी 10.01 ते दुपारी 3.20 दरम्यान पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

ब्लॉक कालावधीत सीएसएमटी -वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील. ब्लॉक कालावधीत ठाणे -वाशी / नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर मार्गावर लोकल उपलब्ध असतील. ब्लॉक कालावधीत पोर्ट मार्गिकेवरील लोकल उपलब्ध असतील.

पश्चिम रेल्वेवरही असेल ब्लॉक

मध्य आणि हार्बरप्रमाणेच पश्चिम रेल्वे मार्गावरही ब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे वर सांताक्रूझ आणि गोरेगाव स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान ब्लॉक असेल . ब्लॉक कालावधीत, जलद मार्गावरील सर्व लोकल सांताक्रूझ – गोरेगाव स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर धावतील. या ब्लॉकमुळे काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत. तर काही बोरिवली आणि अंधेरी लोकल हार्बर मार्गावरून गोरेगावपर्यंत धावतील.

पालघर आणि उमरोली स्थानकांदरम्यान ब्लॉक

पालघर आणि बोईसर स्थानकांदरम्यानच्या दगडी कमानी पुलाच्या जागी नवीन पूल बांधण्यासाठी लागणाऱ्या बॉक्स पुश कामासाठी, पालघर आणि उमरोली स्थानकांदरम्यानचा आरएच गर्डर काढण्यासाठी पश्चिम रेल्वेतर्फे शनिवारी (१८ एप्रिल) एक जंबो ब्लॉक घेतला जाणार आहे.  या ब्लॉकमुळे, काही गाड्या रद्द केल्या जातील, काही गाड्या कमी अंतरावर थांबवल्या जातील किंवा त्यांचे नियमन केले जाणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

शनिवार १८ एप्रिल रोजी मध्यरात्री ०२:१० ते पहाटे ०५:१० या वेळेत पालघर आणि उमरोली स्थानकांदरम्यानच्या डाउन लाईनवर ब्लॉक लागू करण्यात येईल.  याव्यतिरिक्त, 18/19 एप्रिल रोजी रात्री ११:१५ ते मध्यरात्री ०२:१५ या वेळेत अप आणि डाउन दोन्ही लाईन्सवर देखील ब्लॉक लागू करण्यात येईल.

Follow Us
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर.

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर