AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील 63 पैकी तब्बल 38 इमारतींना OC नाही, कारवाईची मागणी

मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील 63 पैकी 38 इमारतींना ओसी (Occupancy Certificate) नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई विद्यापीठाने दिली आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील 63 पैकी तब्बल 38 इमारतींना OC नाही, कारवाईची मागणी
मुंबई विद्यापीठांच्या कुलगुरूचे वीजबिलं अव्वाच्या सव्वा
| Edited By: अक्षय चोरगे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Updated on: Dec 15, 2021 | 10:06 PM
Share

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील 63 पैकी 38 इमारतींना ओसी (Occupancy Certificate) नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई विद्यापीठाने दिली आहे. या इमारती 1975 पासून वर्ष 2017 दरम्यान बांधण्यात आलेल्या आहेत. (38 buildings in Mumbai University’s Kalina Campus do not have OC)

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे त्यांच्या कालीना परिसरातील इमारतीस दिलेल्या ओसीची माहिती मागितली होती. मुंबई विद्यापीठाच्या पायाभूत नियोजन,कार्यान्वयन आणि परिरक्षण खात्याने अनिल गलगली यांना कळवले की एकूण 63 इमारतीपैकी फक्त 25 इमारतींना ओसी मिळाली असून 38 इमारतींना ओसी अद्यापपर्यंत मिळाली नाही. एका इमारतीस पार्ट ओसी आहे.

OC मिळालेल्या इमारती

ज्या इमारतींना ओसी देण्यात आलेली आहे त्यात रानडे भवन, टिळक भवन, वर्क शॉप, WRIC गेस्ट हाऊस, एसपी लेडीज हॉस्टेल, न्यू क्लास क्वार्टर्स, महात्मा फुले भवन, ज्ञानेश्वर भवन, यूरसिसन अभ्यास स्टाफ क्वार्ट्स ए, बी, सी, डी, ई, एफ, सीडी देशमुख भवन, डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन, प्रेस गोडाऊन, अब्दुल कलाम बिल्डिंग, फिरोजशहा मेहता भवन, अण्णा भाऊ साठे भवन, पक्षी भवन, ग्लास भवन, कुलगुरु बंगला या इमारतींचा समावेश आहे. कल्चरल सेंटरला पार्टली ओसी मिळाली आहे.

अद्याप OC न मिळालेल्या इमारती

ज्या इमारतींना अद्यापही ओसी नाही त्यात ICSSR हॉस्टेल, रीडरर्स क्वार्ट्स 12 A, 12B, 12C, विद्यार्थी कॅन्टीन, ओल्ड लेक्चर हॉल कॉम्प्लेक्स, जेएन लायब्ररी, जेपी नाईक भवन, WRIC प्रशासकीय इमारत, आरोग्य केंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील बॉयज हॉस्टेल, एमडीके लेडीज हॉस्टेल, गरवारे इन्स्टिट्यूट ओल्ड, न्यू गरवारे इन्स्टिट्यूट, वर्क शॉप गरवारे, स्टाफ क्वार्ट्स G, पंडिता रमाबाई लेडीज हॉस्टेल, अलकेश दिनेश मोदी गॅलरी, मराठी भवन, आयडॉल इमारत, झंडू इन्स्टिट्यूट, अनेक्स बिल्डिंग, लाईफ सायन्स बिल्डिंग, एक्साम कॅन्टीन, शिक्षक भवन, पोस्ट ऑफिस, सर्व्हट क्वार्ट्स, न्यू लेक्चर कॉम्प्लेक्स, संस्कृत भवन, भाषा भवन, राजीव गांधी सेंटर, आयटी पार्क, शंकरराव चव्हाण टीचर्स टेर्निंग अकादमी,  UMDAE हॉस्टेल,, UMDAE फॉकलिटी बिल्डिंग, नॅनो सायन्स आणि नॅनो टेक्निकल सेंटर या इमारतींचा समावेश आहे.

कारवाईची मागणी

अनिल गलगली यांच्या मते कलीना परिसरातील ज्या इमारतीस ओसी नाही त्यात मुंबई विद्यापीठ आणि वास्तुविशारद यांची चूक असून या बाबीची चौकशी करत कारवाई करण्याची मागणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे. ओसी नसलेल्या इमारतीत हजारों विद्यार्थी आणि विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी वृंद यांची ये-जा असून मंजूर आराखड्याप्रमाणे काम झाले नसून एफएसआय उपलब्ध असल्यामुळे सुधारित आराखडा सादर करण्याची आवश्यकता आहे, असे मत अनिल गलगली यांनी व्यक्त केले आहे. ऑटोडीसीआर ऑनलाईन प्रणाली मार्फत आवश्यक कागदपत्रे सादर केल्यास ओसी मिळवली जाऊ शकते.

इतर बातम्या

Ajit Pawar: वशिष्टी नदीतील गाळ, बेटे काढण्याचे काम तीन टप्प्यात होणार; कोकणातील पूरस्थिती नियंत्रणासाठी अनेक महत्वाचे निर्णय

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन वंचित बहुजन आघाडी आक्रमक; जाती निहाय जनगणनेसाठी विधानभवनावर मोर्चा धडकणार

कुलगुरुंच्या नियुक्तीचा अधिकार राज्य सरकारकडे, तरीही राज्यपालांचे अधिकार अबाधित, उदय सामंतांचा दावा

(38 buildings in Mumbai University’s Kalina Campus do not have OC)

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...