AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हिंदू रस्त्यावर उतरले म्हणून हे घाबरले’, घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीवरुन वाद

मीरा रोड नंतर आता मुंबई मधील घाटकोपर सागर पार्क सोसायटी मध्ये बकरा कुर्बानीला विरोध होत आहे. मीरा रोड येथील घटनेनंतर आता घाटकोपर मधील सागर पार्क सोसायटी मध्ये गेल्या 30 वर्षा पासून बकरा कुर्बानी सुरु होती.

'हिंदू रस्त्यावर उतरले म्हणून हे घाबरले', घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटीत बकरा कुर्बानीवरुन वाद
Ghatkopar
| Updated on: May 27, 2026 | 1:05 PM
Share

मीरा रोड नंतर आता मुंबई मधील घाटकोपरच्या सागर पार्क सोसायटी मध्ये बकरा कुर्बानीला विरोध होत आहे. मीरा रोड मध्ये बकरा कुर्बानीवरुन मोठा वाद झाला. विषय हाणामारीपर्यंत पोहोचला. तिथल्या घटनेनंतर आता घाटकोपर मधील सागर पार्क सोसायटी मध्ये विरोध होत आहे. या सोसायटीत गेल्या 30 वर्षा पासून बकरा कुर्बानी सुरु होती. काल मध्य रात्री अचानक BMC ने बकरा कुर्बानीची परवानगी रद्द केली. “बकरा कुर्बानी सोसायटीच्या आवारात नाही करणार. महापालिकेने आम्हाला दुसरी जागा उपलब्ध करून द्यावी. आम्ही तिकडे बोकड कुर्बानी करणार. आम्हाला कुठेही सोसायटीचं नाव खराब करायचं नाही” असं इथे राहणाऱ्या नागरिकांनी सांगितलं.

आज या सोसायटीमध्ये किरीट सोम्यादेखील दाखल होणार आहेत. त्या अगोदर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. पोलिस आणि स्थानिकांचा आपसात वाद वाढला. राज्य राखीव तुकडी सागर सोसायटी मध्ये दाखल.

किरीट सोमय्या काय म्हणाले?

“कुर्बानीसाठी 22-23 बकरे नेण्यात आलेत. या सोसायटीत उद्या कुर्बानी होऊ देणार नाही. सागर पार्क सोसायटी या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या 31 बोकडा पैकी 23 बोकड मुंबई महानगरपालिकेने ताब्यात घेतली आहेत. यापुढे एकाचीही कुर्बानी या ठिकाणी दिली जाणार नाही. कुर्बानीसाठी मुंबई महापालिका त्यांना योग्य ठिकाणी जागा देत आहे” असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

“सुरक्षा राखणं हे पोलिसांचं काम आहे. प्रत्येक जागेवर सोमय्या जाणार का?. आम्हा इथे कुर्बानी होऊ देणार नाही. दोन दिवसांपूर्वी हिंदु रस्त्यावर उतरले म्हणुन हे घाबरले” असं किरीट सोमय्या म्हणाले.

संजय शिरसाट काय म्हणाले?

“सोसायटीमध्ये तुम्ही असे कत्तलखाने तयार करू शकत नाहीत. निश्चित सण आहे, ज्या ठिकाणी कत्तली होतात त्याला आपण खाटीक खाणे म्हणतो त्या ठिकाणी काय केलं ते तो भाग वेगळा. परंतु सोसायटीत ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी हत्या करणे हे बरोबर नाही. त्याला कोणीही पाठिंबा देत नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल