AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खास ‘मावळा’ समुद्राखाली 400 मीटरचे बोगदे खोदणार, मुंबईच्या समुद्रात काम नेमकं कसं चालणार?

Mumbai Costal Road : शिवसेनेचा मुंबईतील महत्त्वकांक्षी कोस्टल रोडचा (Mumbai Costal Road) प्रकल्पही विविध कारणांनी चर्चेत असतो.

खास 'मावळा' समुद्राखाली 400 मीटरचे बोगदे खोदणार, मुंबईच्या समुद्रात काम नेमकं कसं चालणार?
Sachin Patil | सचिन पाटील
Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Dec 21, 2020 | 11:47 AM
Share

मुंबई : महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती वेगवेगळ्या प्रकल्पांची. मेट्रो कारशेड आणि बुलेट ट्रेन प्रकल्पांचं राजकारण तर देशभरात गाजत आहे. याशिवाय शिवसेनेचा मुंबईतील महत्त्वकांक्षी कोस्टल रोडचा (Mumbai Coastal Road) प्रकल्पही विविध कारणांनी चर्चेत असतो. सध्या या कोस्टल रोडचं काम जोरात सुरु आहे. मुंबई महापालिकेने (BMC) हा सर्वात मोठा प्रकल्प हाती घेतला आहे. या प्रकल्पासाठी खास मशीन (Mawla machine coastal road) काम करत आहे. त्याचं नाव आहे मावळा.  (all about to know Mumbai Coastal Road project length, rout, budget)

पश्चिम उपनगरातील ट्रॅफिकवर मार्ग काढण्यासाठी ‘शामलदास गांधी उड्डाणपूल’ (प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर) ते ‘राजीव गांधी सागरी सेतू’ (वांद्रे वरळी सी लिंक) वरळी आणि कांदिवलीपर्यंत कोस्टल रोड उभारला जात आहे. कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली (Mumbai Coastal Road princess street to kandivali) या दरम्यानचा एकूण 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे. याचा पहिला टप्पा प्रिन्सेस स्ट्रीट ब्रिज ते वरळी सी लिंक असा आहे. याचं काम मुंबई महापालिका (BMC) करत असून, यासाठी पालिका 12 हजार 721 कोटी रुपये खर्च करणार आहे. कोस्टल रोडच्या कामाने आता वेग घेतला आहे. या कामासाठी आतापर्यंत 1281 कोटी रुपये खर्च झाले आहेत.

समुद्राखाली 400 मीटरचे बोगदे, खास ‘मावळा’ सज्ज

कोस्टल रोड हा एक आव्हानात्मक आणि निसर्गाला चॅलेंज देणारा असा खडतर मार्ग आहे. अरबी समुद्राखालील तब्बल 175 एकर जमिनीवर भराव टाकण्यात आला आहे. तर अजून 102 एकर समुद्राखालील जमिनीवर भराव टाकण्यात येणार आहे. इतकंच नाही तर या मार्गावर समुद्राखालून 400 मीटरचे बोगदे असतील. हे बोगदे खोदण्यासाठी मावळा (Mawla machine coastal road) हे मशीन आणलं आहे. पुढील महिन्यात बोगद्याचं काम सुरु होणार आहे.

Mawla machine_Mumbai coastal road

कोस्टल रोड प्रकल्पाचं 17 टक्के काम सुरु झालं असून जुलै 2023 पर्यंत काम पूर्ण होईल, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांनी दिली.

मावळा मशीन कसं आहे?

बोगदा खणणारं मावळा मशीन (टीबीएमचा) हे या प्रकल्पातील महत्त्वाचं साधन आहे. या मशीन 12.19 मीटर व्यासची आहे. हे भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठ्या व्यासाचा टीबीएम मशीन आहे. बोगद्याचा तयार केलेला व्यास 11 मीटर बोगद्यात सर्व सुरक्षेची व्यवस्था असेल. या टीबीएम मशीनला मावळा असं नाव देण्यात आलं आहे.

कोस्टल रोड महत्वाचा का?

मुंबई सागरी किनारी रस्ता प्रकल्प (दक्षिण) हा मुंबई महापालिकेने हाती घेतलेला एक अत्यंत प्रतिष्ठित आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. कोस्टल रोडमुळे प्रवासाचा वेळ वाचेल, सध्या रस्त्यावर असणारं ट्रॅफिक कमी होईल, शिवाय वायू आणि ध्वनी प्रदूषणाची पातळी कमी होईल असा दावा करण्यात आला आहे. या सर्वामुळे सार्वजनिक वाहतुकीला शिस्त येईल आणि अतिरिक्त हरित पट्ट्यांची निर्मिती होईल, असा पालिकेचा मानस आहे.

चार टप्प्यात प्रकल्पाचं काम

हा संपूर्ण प्रकल्प 4 टप्यात पूर्ण केला जाणार आहे . प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वांद्रे वरळी सी लिंकच्या दक्षिण टोकापर्यंत आहे. या रस्त्याची लांबी 10.58 किलोमीटर आहे. तर प्रस्तावित किनारी रस्ता प्रकल्पामध्ये 4 + 4 लेन भरणीवरील रस्ते, पूल, उन्नत रस्ते आणि बोगदे असणार आहेत. हा संपूर्ण प्रकल्प तीन पॅकेजेसमध्ये विभागलेला आहे. पॅकेज 4 प्रिंसेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते प्रियदर्शिनी पार्क असेल, तर पॅकेज 1 प्रियदर्शिनी पार्क ते बडोदा पॅलेस आणि पॅकेज 2 बडोदा पॅलेस ते वांद्रे वरळी सी लिंक असणार आहे .

कोस्टल रोड प्रकल्प काय आहे?

कोस्टल रोड हा प्रिन्सेस स्ट्रीट ते कांदिवली या दरम्यानचा 35.6 किमी लांबीचा मार्ग आहे. समुद्र किनारपट्टीलगत भराव टाकून, पूल आणि बोगदा असा हा मार्ग असेल. कोस्टल रोडमुळं प्रवासाच्या वेळेत 70 टक्क्यांची बचत होणार आहे. तर 34 टक्के इंधन वाचणार आहे. या प्रकल्पाचा खर्च 12 हजार कोटींपेक्षा अधिक असल्याचंही बोललं जातं.

 Mumbai coastal road

हा रोड मुंबई शहरातून पश्चिम उपनगरांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर वाहतूकीच्या कोंडीचा प्रश्न सोडवणार आहे. प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी दरम्यान कोस्टल रोड 9.98 किमी लांबीचा असणार आहे. कोस्टल रोडवर 1650 वाहनं पार्किंगची सोय असेल. याच्या बांधकामासाठी 4 दशलक्ष मेट्रिक टनचं मटेरियल लागणार आहे. माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार आहेत. कोस्टल रोडमुळं 26 हजार कोटी रुपयांची 90 हेक्टर जमीन खुली होणार आहे. विशेष म्हणजे पुरामध्येही कोस्टल रोडचा वापर शक्य होणार आहे.

कोस्टल रोड कसा असेल, काय वैशिष्ट्य आहेत?

  • साडे सहा किलोमीटरचे बोगदे
  • आठ लेनचा मार्ग, मार्गावर ४ इंटरचेंज
  • सिग्नल फ्री मार्ग
  • 34 % इंधन बचत होणार
  • 1650 वाहन पार्किंगची सोय
  • 4 दशलक्ष मेट्रिक टनच मटेरियल वापरणार
  • माल आणण्यासाठी दोन जेट्टी उभारणार
  • 4 वर्षाचा कालावधी
  • 90 हेक्टर ओपन जागा, 26 हजार कोटींची जागा उपलब्ध होणार
  • पुरामध्ये देखील हा मार्ग वापरता येणार

कोर्टाची स्थगिती 154 दिवसांनी उठली

कोस्टल रोडसाठी समुद्रात भराव टाकल्याने समुद्री जीवाला धोका निर्माण होईल, या आशयाची याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. प्रकल्प राबवताना महापालिका प्रशासनाने पर्यावरण विषयक परवानग्या घेतल्या नसल्याचे उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आले होते. या प्रकल्पासाठी 16 जुलै रोजी उच्च न्यायालयाने तर 19 जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. नवे बांधकाम न करण्याच्या अटीवर न्यायालयाने 154 दिवसांनी स्थगिती उठवली. पर्यावरण प्रेमी आणि कोळीबांधवाची नाराजी दूर करण्यासाठी आता इको ब्रिक्सचा वापर केला जाणार आहे.

(all about to know Mawla machine Mumbai Coastal Road project length, rout, budget)

संबंधित बातम्या 

समुद्र जीव वाचवण्यासाठी कोस्टल रोड कामात इस्रायल इको फ्रेंडली विटांचा वापर 

शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कोस्टल रोडला सुप्रीम कोर्टाचा ग्रीन सिग्नल, केवळ रस्ताच बांधण्याची अट

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!.

Naimisha Pradhan : धर्मेंद्र प्रधान यांच्या मुलीने केलं इन्स्टाग्राम खातं बंद, प्रचंड ट्रोलिंगमुळे तडकाफडकी निर्णय!

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ.

मोठी बातमी! …तर सोनम वागंचूक आजच उपोषण मागे घेणार मोठी घोषणा, सरकारसमोर दोन अटी, रुग्णालयातून पहिला व्हिडीओ

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा.

मोठी बातमी! ठाकरे बंधू रस्त्यावर उतरणार, विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी 26 तारखेला संयुक्त मोर्चा

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी.

मोदींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा न घेण्यामागचं ओडिशा कनेक्शन? वाचा इन्साईड स्टोरी

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण….

निर्भय बनो…! झिम्बाब्वे दौऱ्यात निर्धास्तपणे खेळा, कर्णधार श्रेयस अय्यरचा टीम इंडियाला कानमंत्र; पण…

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं.

66 दिवसांपूर्वी क्रिकेटपटूच्या मृत्यूची अफवा, आता थेट संघाचं कर्णधारपद मिळालं