AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bandatatya Karadkar: स्त्रियांच्या पर्सनल आयुष्यावर बोलणं चुकीचं, ही मानसिकता बदलावी लागेल; अमृता फडणवीसांची बंडातात्यांवर टीका

भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्या वादग्रस्त विधानावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्त्रियांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे. ही मानसिकता अशी बदलावी लागेल.

Bandatatya Karadkar: स्त्रियांच्या पर्सनल आयुष्यावर बोलणं चुकीचं, ही मानसिकता बदलावी लागेल; अमृता फडणवीसांची बंडातात्यांवर टीका
स्त्रियांच्या पर्सनल आयुष्यावर बोलणं चुकीचं, ही मानसिकता बदलावी लागेल; अमृता फडणवीसांची बंडातात्यांवर टीका
ReporterSameer Bhise
ReporterSameer Bhise | Edited By: | Updated on: Feb 04, 2022 | 12:39 PM
Share

राहुल झोरी, मुंबई: भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) यांच्या वादग्रस्त विधानावर पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. स्त्रियांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे. ही मानसिकता अशी बदलावी लागेल, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी बंडातात्यांवर टीका केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule and Pankaja Munde) या दारू पितात, नाचतात असं वादग्रस्त विधान बंडातात्या कराडकर यांनी केलं आहे. त्याचे संपूर्ण राज्यात पडसाद उमटत आहेत. अनेक ठिकाणी बंडातात्यांच्या पुतळ्याचं दहन केलं जात आहे. हा वाद वाढत चालल्याने बंडातात्या कराडकर यांनी माफी मागितली आहे. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं आहे.

मला वाटतं स्त्रियांनी आपल्या देशात अधीच खूप त्रास सहन केला आहे. त्यामुळे स्त्रियांवर टिप्पणी करणं आणि त्यांच्या खासगी आयुष्यावर बोलणं चुकीचं आहे. त्यापासून दूर राहिलं पाहिजे. आपल्या देशात नेहमी हेच होतं. कोणी काही बोललं की त्यावर आपण आंदोलन करतो. पण या गोष्टी मानसिकतेशी संबंधित आहे. आपणच ठरवलं पाहिजे काय बोलावं आणि काय बोलू नये. स्त्रियांच्यांवर अत्याचार होतात तेव्हाच आपण बोलतो किंवा कारवाई करतो. पण आता आपल्याला आपल्या मानसिकतेत रिव्हॉल्यूशनरी चेंज आणावा लागेल, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.

पर्सनल कमेंट नको

खासगी आयुष्य आणि राजकारण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवाव्यात. पर्सनल कमेंट करू नये. एखाद्या नेत्याने पत्नीला पार्टनर केलं, तिला काही कंपनीत रोल दिला. तिथे जर घोटाळा झाला तर त्याबाबतही सावध भूमिका असायला हवी, असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं.

अवगुण सुधारा

महाआघाडीतील स्त्रियांवर काही अन्याय झाला तर महिला आयोगाकडून तात्काळ दखल घेतली जाते. पण भाजपशी संबंधित महिलेबाबत काही झालं तर त्याची दखल घेतली जात नाही, याबाबत तुमचं काय म्हणणं आहे, असा सवाल पत्रकारांनी अमृता यांना केला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. महावसुली सरकारची कामे तशीच चालू आहेत. हे बायस सरकार आहे. या सरकारमध्ये एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय दिला जातो. खरं तर हे सरकारमधील अवगुण आहेत. त्यांनी ते सुधारावेत, असा टोला त्यांनी लगावला.

संघ-भाजप पुरोगामी

यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजप पुरोगामी असल्याचा दावा केला. भाजप-संघ पुरोगामी आहेत. ते स्त्रियांचा मान ठेवतात. मी नॉन पॉलिटिकल व्यक्ती आहे. पण भाजप आणि संघाच्या जवळ आहे. स्त्रियांचा जर कोणी सर्वाधिक आदर देत असेल तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे, असा दावाही त्यांनी केला.

फडणवीसांची बायको हे विसरून जा

मी फडणवीसांची बायको आहे हे तुम्ही विसरून जा. मी सामान्य नागरिक म्हणून बोलते. मी रोज सामान्य स्त्री सारखी घराबाहेर पडते. त्यावेळी मलाही ट्रॅफिक आणि रस्त्यांवरील खड्ड्यांचा त्रास होतो. रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खड्डे आहेत. ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात. कारण आपण कुटुंबाला वेळ देत नाही. मुंबईत अनेक इश्यू आहेत. मेट्रो, रस्ते, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आहेत. त्याकडे लक्ष न देता सरकार खिसे भरू लागले तर त्यावर टीका होणारच. तुम्ही या मुद्द्यांवर लक्ष दिलं पाहिजे. ती मुंबईची गरज आहे, असं त्या म्हणाल्या. तसेच नॉटी वगैरे नावं लोकांनीच दिली आहेत. त्याचा अर्थ शब्दश: घेऊ नका. त्याचा भावार्थ समजून घ्या, असंही त्या म्हणाल्या.

संबंधित बातम्या:

Video: पतंगराव कदमांचा एक पोरगा कशानं गेला माहितय का? बंडातात्या कराडकरांनी मर्यादा ओलांडली?

Rupali Patil | बंडातात्या दारु पिऊन बोलले, राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचं त्याच भाषेत उत्तर, आणखी काय बोलल्या?

Bandatatya Karadkar: कुणाबद्दल आकस नाही, द्वेष नाही, अनावधानाने बोललो, सर्वांची माफी मागतो; बंडातात्या कराडकरांची जाहीर दिलगीरी

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली