Anjali Damania : बात निकली है तो दूर…कलेक्टर, आयजी आणि ते राजकारणी…अजितदादांच्या घराबाहेर कुणाची काळी जादू?

Anjali Damania on Collector, IG and Politicians: भोंदू अशोक खरातच्या दरबारात अनेक राजकारणीच नाही तर प्रशासकीय सेवेतील अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षकांचीही हजेरी लागल्याचा खळबळ उडवून देणारा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला आहे. ते 1825 नंबर आणि कॉल कुणाचे?

Anjali Damania : बात निकली है तो दूर...कलेक्टर, आयजी आणि ते राजकारणी...अजितदादांच्या घराबाहेर कुणाची काळी जादू?
अंजली दमानिया उद्या कोणता गौप्यस्फोट करणार?
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 10:00 AM

Anjali Damania on Collector, IG and Politicians: भोंदू अशोक खरात प्रकरणाची शेपटू संपता संपत नसल्याचे तपासात उघड झाले आहे. ‘बात निकली है तो दूर तलक जाएगी’ असे संकेत देत आता या भोंदूगिरीच्या चिखलात प्रशासकीय सेवेतील अधिकारी, जिल्हाधिकारी, पोलीस महानिरीक्षकांसह बडे राजकारणी ओढल्या जाणार आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या उद्या या प्रकरणात सर्वात मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. खरातला कॉल करणाऱ्या राजकारण्यांची नावं ऐकून धक्का बसेल असा पहिलाच स्फोट त्यांनी केला आहे. ते ते 1825 नंबर आणि कॉल कुणाचे? याची चर्चा सुरू झाली आहे.

अजितदादांच्या घराबाहेर कुणाकडून काळी जादू?

दिवंगत अजितदादा पवार यांच्या घराबाहेर काळी जादू करण्यात आल्याचा सातत्याने आरोप करण्यात येत आहे. दोन्ही राष्ट्रवादीतील नेत्यांचा या विषयीचा आरोप आहे. तर याप्रकरणी उद्या बुधवारी 15 एप्रिल रोजी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया मोठा गौप्यस्फोट करणार आहेत. उद्या त्यांच्या दाव्याने कुणाला फटका बसणार आणि त्या कुणाचे नाव घेणार याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

कलेक्टर, आयजी आणि राजकारणी

अशोक खरातच्या दरबारात बडे राजकारणीच नाही तर प्रशासकीय सेवेतील अधिकारी, जिल्हाधिकारी आणि पोलीस महानिरीक्षकांनही हजेरी लावल्याचे म्हटले जात आहे. 1825 नंबर्सवरून खरातला फोन आले आहेत. तर काही जणांना खरातने फोन केला आहे. या सर्वांची कुंडलीच अंजली दमानिया उद्या सर्वांसमोर आणणार आहेत. खरातला कॉल करणाऱ्यांची यादीच त्या जाहीर करण्याची शक्यता आहे. राजकारण्यांची नावं ऐकूण धक्का बसेल असा दावा त्यांनी केला आहे.

अंजली दमानिया उद्या पत्रकार परिषद घेणार आहे. 1825 नंबर्सवरून खरातला फोन आले आहेत. त्यात पोलीस निरीक्षक, तहसीलदारापासून ते अनेक अधिकारी आहेत. अशोक खरात याने यंत्रणेचा वापर केला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी त्याने हा वापर केला आहे. राजकारण्यांना सुद्धा मोठा फायदा मिळवून दिल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केला. याविषयीचा मोठा खुलासा दमानिया उद्या पत्रकार परिषदेत करणार आहेत.

Follow Us