AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Anjali Damania: ‘किती किती खोटं बोलता हो’,अंजली दमानियांचा प्रतिभा चाकणकरांवर हल्लाबोल, अशोक खरातसोबतची कॉल कुंडलीच बाहेर काढली

Anjali Damani on Pratibha Chakankar: रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी ८ तास चौकशी करण्यात आली. समता पतसंस्थेतील त्यांच्या खात्यातून २ कोटी ४० लाखांचा व्यवहार झाल्याप्रकरणात चौकशी करण्यात आली. प्रतिभा चाकणकरांनी ही बनावट खाती आणि बनावट स्वाक्षरी असल्याचे सांगत सर्व दावे फेटाळले आहेत. त्याचा आता अंजली दमानिया यांनी समाचार घेतला आहे.

Anjali Damania: 'किती किती खोटं बोलता हो',अंजली दमानियांचा प्रतिभा चाकणकरांवर हल्लाबोल, अशोक खरातसोबतची कॉल कुंडलीच बाहेर काढली
अंजली दमानिया प्रतिभा चाकणकर, भोंदू अशोक खरातImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Apr 14, 2026 | 8:51 AM
Share

Pratibha Chakankar-Ashok Kharat SIT: राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांची काल शिर्डी पोलिसांनी ८ तास कसून चौकशी केली. अशोक खरात याच्याशी त्यांचे आर्थिक व्यवहार झाल्याचा संशय आल्यानंतर त्यांना चौकशीसाठी पाचरण करण्यात आले. समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे ४ खाती आहेत. खात्यातून २ कोटी ४० लाखांचा व्यवहार झाल्याप्रकरणात चौकशी करण्यात आली. प्रतिभा चाकणकरांनी ही बनावट खाती आणि बनावट स्वाक्षरी असल्याचे सांगत सर्व दावे फेटाळले आहेत. अंजली दमानिया यांनी त्यांच्या सर्व दाव्यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी एक ट्विट करून अशोक खरात आणि प्रतिभा चाकणकर यांच्यातील संवादाची कॉल कुंडलीच बाहेर काढली आहे.

प्रतिभा चाकणकर किती किती खोट्या बोलल्या

प्रतिभा चाकणकर यांनी चौकशीनंतर त्यांची बाजू माध्यमांसमोर मांडली. ही सर्व खाती बनावट आहेत. आपली स्वाक्षरी ही बनावट असल्याचे सांगत त्यांनी खरातशी आर्थिक व्यवहार झाले नसल्याचा दावा केला. तसेच सर्व आरोप फेटाळले. याप्रकरणी अंजली दमानिया यांनी ट्विट करून प्रतिभा चाकणकरांवर हल्लाबोल केला.

प्रतिभा चाकणकर आज किती किती खोटं बोलल्या. “खाते बनावट आहे, सह्या खोट्या आहेत” असे बोलून हात झटकले? KYC केलेले अकाउंट खोटे असूच शकत नाहीत. त्यांचे कॉल रेकॉर्ड पहा म्हणजे कळेल. ते खालील प्रमाणे आहेत, असे ट्विट करत दमानिया यांनी कॉल कुंडलीच बाहेर काढली.

कॉल कुंडलीच बाहेर काढली

१ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीत प्रतिभा चाकणकर आणि भोंदू अशोक खरात यांच्यात किती कॉल झाले आहेत, याची कुंडलीच अंजली दमानिया यांनी समोर आणली.

प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यातील संपर्क

२३६ कॉल रेकॉर्डमधील १७ कॉल सगळे कॉल खरातांनी प्रतिभाजींना केले.

२१८ मेसेज सगळे प्रतिभाजींनी खारातांना केले.

मला मुलांबद्दल बोलायला आवडत नाही, पण आज तन्मय चाकणकर तिथे गेला होता म्हणून सांगते.

तन्मय चाकणकर कॉल रेकॉर्ड ३७

११ कॉल तन्मय ने खारातांना केले

२० कॉल खरातांनी तन्मयला केले

८ SMS तन्मय ने खरातांना केले

१ SMS खरातांनी तन्मय ला केला

मग बनावट आणि खोटं कसे असू शकेल

२१९ मेसेज कसले होते ?

त्या त्यांच्या वकील बाई महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या सदस्या आहेत. हे “पूर्णवेळ” पद आहे. आयोगाचे सदस्य हे शासनाने नियुक्त केलेले पूर्णवेळ सरकारी पद मानले जाते. त्यामुळे त्यांना खाजगी वकिली करण्यास प्रतिबंध आहेत. बहुदा राष्ट्रवादी पक्षाने त्यांना पाठवले असे, असा टोलाही अंजली दमानिया यांनी लगावला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...