AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जो अख्खं जहाज खरेदी करु शकतो, त्याला ड्रग्ज विकायची गरज काय, आर्यन खानच्या युक्तीवादातील 10 मुद्दे

Satish ManeShinde : ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेली एका दिवसाच्या कोठडीची मुदत सपंल्यानंतर आर्यन खानला काल 4 ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला.

जो अख्खं जहाज खरेदी करु शकतो, त्याला ड्रग्ज विकायची गरज काय, आर्यन खानच्या युक्तीवादातील 10 मुद्दे
ARYAN KHAN
| Edited By: Sachin Patil | सचिन पाटील | Updated on: Oct 05, 2021 | 11:31 AM
Share

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) ड्रग्ज पार्टीप्रकरणात 7 ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी सुनावण्यात आली आहे. मुंबई-गोवा क्रूजवर 2 ऑक्टोबरच्या रात्री NCB ने धाड टाकून, आर्यन खानच्या पार्टीतील ड्रग्जचा भांडाफोड केला. आर्यन खान आणि अरबाज मर्चंटसह इतर आठ जणांना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी देण्यात आली आहे. मुंबईतील किला कोर्टात सर्व आरोपींना हजर करण्यात आलं होतं. यावेळी NCB कडून अतिरिक्त महाधिवक्ते अनिल सिंह यांनी आर्यनच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. तर आर्यन खानकडून वकील सतीश मानेशिंदे (Satish ManeShinde) यांनी युक्तीवाद केला.

ड्रग्ज प्रकरणात देण्यात आलेली एका दिवसाच्या कोठडीची मुदत सपंल्यानंतर आर्यन खानला काल 4 ऑक्टोबरला दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयात तब्बल अडीच तासांचा युक्तिवाद झाला.

मानेशिंदेंचा दावा काय?

आर्यन खानच्या बाजूने प्रसिद्ध वकील सतिश मानेशिंदे यांनी युक्तिवाद केला. आर्यन खान याच्याकडे कोणतेही ड्रग्ज सापडलेले नव्हते. तसेच त्याकडे बोर्डिंग पास नव्हता. त्याला पार्टीचं निमंत्रण देण्यात आलं होतं. त्यामुळे तो पार्टीसाठी गेला होता. त्याची बॅग चेक करण्यात आली तेव्हा त्याच्या बॅगेतही काहीच मिळालं नाही. त्याचा मित्र अरबाज याच्याकडे 6 ग्रॅम चरस सापडलं. दिल्लीची मॉडेल मुनमुन धरेजा हिच्याकडे 5 ग्रॅम चरस सापडलं होतं. या दोन आरोपींकडे सापडलेल्या ड्रग्जचा आर्यनचा संबंध नाही, असं आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात सांगितलं.

सतीश मानेशिंदे यांचे युक्तीवाद

1. सतीश मानेशिंदे : (आर्यन खान) मला माहिती नाही मला कोणती जागा देण्यात आली आहे, मी जहाजासाठी एक पैसाही आयोजकांना दिला नाही, मी आयोजकांपैकी एकालाही ओळखत नाही.

2. सतीश मानेशिंदे : माझ्या मोबाईलशिवाय माझी एकही वस्तू जप्त करण्यात आलेली नाही. माझ्या मित्रांना यासाठी अटक करण्यात आलं कारण त्यांच्याकडे 6 ग्रॅम चरस मिळालं होतं. माझा त्याच्याशी अजिबात संबंध नाही.

3. सतीश मानेशिंदे : माझ्याकडे कोणतेही ड्रग सापडलं नाही, ते दुसऱ्यांकडे मिळालं. त्यामुळे मला त्याच्याशी जोडता येणार नाही.

4. सतीश मानेशिंदे : माझ्या चौकशीत माझे व्हॉट्सअॅप चॅट डाऊनलोड करण्यात आले आहे. जेव्हा मी परदेशात होतो, तेव्हा माझ्या चॅटमधून आंतरराष्ट्रीय ड्रग ट्रॅफिकिंगचे संकेत देतात असा त्यांचा दावा आहे. मी परदेशात होतो तेव्हा मी कोणत्याही प्रकारच्या ड्रग्सची तस्करी, खरेदी आणि विक्रीमध्ये सहभागी नव्हतो.

5. सतीश मानेशिंदे : माझ्या चॅटमधून, फोटोंमधून मी कोणत्याही ड्रग्जप्रकरणात सहभागी असल्याचं सिद्ध होत नाही. जर माझ्या चॅटमधून ड्रग्ज तस्करीचे संकेत दिसत असतील तर त्याबाबत पाहिलं जाऊ शकतं. मात्र तसे कोणतेही संकेत दिसत नाहीत.

6. सतीश मानेशिंदे : माझा जामीन आणि रिमांडबाबत विचार होऊ शकतो. रिकव्हरी किंवा जप्तीची आवश्यकता नाही. पुढच्या अटकेच्या कारवाईसाठी कोणताही आधार नाही.

7. सतीश मानेशिंदे : ड्रग्ज खरेदी केलं किंवा विकलं याचे कोणतेही पुरावे नाहीत. मी एक 24 वर्षांचा मुलगा आहे. ज्याचं यापूर्वीचं कोणतंही गुन्हेगारीचं रेकॉर्ड नाही. दुसऱ्यांनी काय केलं ते माझ्यावर थोपवलं जाऊ शकत नाही.

8. सतीश मानेशिंदे : 48 तासानंतरही माझ्याकडून काहीही मिळालं नाही. माझी जी काही चौकशी करायची होती, ती केली. मी त्यासाठी पूर्ण सहकार्य केलं. त्यांनीही माझ्याशी योग्य वर्तन केलं. मी काहीही डिलीट केलेलं नाही.

9. यादरम्यान सतीश मानेशिंदे आणि अतिरिक्त महाधिवक्ते अनिल सिंह यांच्यात जोरदार युक्तीवाद झाला. अनिल सिंह म्हणाले, तो त्या जहाजावर का गेला होता? त्याला उत्तर देताना मानेशिंदे म्हणाले, तो तिथे होता याचा अर्थ असा नाही की आर्यन तिथे ड्रग्ज विकत होता, जर त्याची इच्छा असेल तर तो पूर्ण जहाज खरेदी करु शकेल.

10. सतीश मानेशिंदे : आर्यनविरुद्ध कोणतेही पुरावे नाहीत. जहाजावर अन्य 1000 लोक होते, त्यांचीही चौकशी करा.

संबंधित बातम्या  

बाप म्हणून शाहरुख खानला वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नाही? आज कोर्टात नेमकं काय झालं? पुढे काय होणार?  

aryan khan drug case | आर्यन खानला दिलासा नाहीच, कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Follow Us
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती
दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?
Dahi Handi in Thane | रेकॉर्ड ब्रेक करा, पण... दहीहंडी उत्सवात सुनील शेट्टींनी गोविंदांना काय दिला खास संदेश?