बाप म्हणून शाहरुख खानला वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नाही? आज कोर्टात नेमकं काय झालं? पुढे काय होणार?

अडीत तास चाललेल्या युक्तिवादानंतर आर्यन खानसह अन्य दोन आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे बाप म्हणून शाहरुख खानला आता वाट पाहण्याशिवाय काही पर्याय राहिलेला दिसत नाही.

बाप म्हणून शाहरुख खानला वाट बघण्याशिवाय काहीच पर्याय नाही? आज कोर्टात नेमकं काय झालं? पुढे काय होणार?
Shahrukh Khan Aryan Khan
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Oct 04, 2021 | 6:24 PM

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानच्या मुलाच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. कारण, मुंबईतील क्रुझ पार्टीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन उघड होत असल्याचा दावा एनसीबीच्या वकिलांनी आज कोर्टात केलाय. तब्बल अडीत तास चाललेल्या युक्तिवादानंतर आर्यन खानसह अन्य दोन आरोपींना 7 ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे बाप म्हणून शाहरुख खानला आता वाट पाहण्याशिवाय काही पर्याय राहिलेला दिसत नाही. (Aryan Khan remanded in police custody till 7 October)

आपल्या मुलाला जामीन मिळवण्यासाठी शाहरुख खानने मोठे प्रयत्न केले होते. शाहरुख आणि गौरी खान यांनी आपला विदेशातील दौरा रद्द करत या आपल्या मुलाच्या प्रकरणात लक्ष घातलं होतं. इतकंच नाही तर वकिलांमार्फत शाहरुख खान आणि आर्यनचं दोन मिनिटे बोलणंही झाल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी आर्यन खान रडल्याची माहिती मिळतेय. एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती.

शाहरूख खानकडे वाट पाहण्याशिवाय पर्याय नाही

दरम्यान, या प्रकरणात सर्व आरोपींची 11 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी देण्याची मागणी एनसीबीच्या वकिलांकडून करण्यात आली होती. मात्र कोर्टाने आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही 7 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अजून तीन दिवस आर्यन खानचा मुक्काम कोठडीत असेल हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता पुढील सुनावणीपर्यंत एनसीबीला काय माहिती मिळते त्यावर पुढील गोष्टी अवलंबून असणार आहे. तोपर्यंत शाहरुख खानला वाट पाहण्याशिवाय काही करता येणार नाही.

कोर्टात नेमकं काय घडलं?

जवळपास अडीच तासापेक्षा जास्त वेळ कोर्टात युक्तीवाद झाला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने 7 ऑक्टोबरपर्यंत आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेजा या तिघांना कोठडी सुनावली. या तिघांच्या चौकशीतून काय माहिती समोर येईल ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात युक्तीवाद करताना याआधीच्या अनेक प्रकरणांचा संदर्भ दिला. ड्रग्ज प्रकरणात कशाप्रकारे सेक्शन लावले जातात, याबाबतची माहिती दिली होती. कोर्टाने एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना आरोपींच्या कोठडीबाबत विचारलं तेव्हा त्यांनी कोठडी हवी असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोर्टाने 7 तारखेपर्यंत कोठडी सुनावली.

सलमान खान शाहरुखच्या ‘मन्नत’वर दाखल

अभिनेता सलमान खान काल रात्री दहाच्यानंतर शाहरुखच्या ‘मन्नत’ ह्या बंगल्यावर दाखल झाला होता. अर्थातच सकाळपासूनच शाहरुखच्या घराबाहेर माध्यमकर्मींनी गर्दी केलीय. त्यामुळे शाहरुखच्या घरातून कोण बाहेर पडतंय, कोण आत जातंय यावर कॅमेऱ्यांचं बारीक लक्ष आहे. सलमान खान रात्री आला त्यावेळेस तो येत असल्याची कुणकुण पत्रकारांना लागलेलीच होती. त्यामुळे तो येताच कॅमेऱ्यांनी एकच गराडा घातला होता.

इतर बातम्या :

Mumbai drugs case : आर्यन खानच्या फोनमध्ये आक्षेपार्ह फोटो, कोर्टात NCBचा मोठा दावा

aryan khan drug case | आर्यन खानला दिलासा नाहीच, कोठडीत 7 ऑक्टोबरपर्यंत वाढ

Aryan Khan remanded in police custody till 7 October

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें