AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cruise Party EXCLUSIVE Video : आर्यन खानला NCB ने उचललं, त्या क्रुझ पार्टीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ

एनसीबीच्या सूत्रांनुसार, जर आर्यनला या कार्यक्रमात अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले असेल, तर त्याला यासाठी काही आमंत्रण किंवा काही प्रकारचा प्रस्ताव असायला हवा होता. परंतु त्याच्याकडे असे कोणतेही आमंत्रण किंवा प्रस्ताव नाही

Cruise Party EXCLUSIVE Video : आर्यन खानला NCB ने उचललं, त्या क्रुझ पार्टीचा एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ
क्रुझवरील पार्टीचा फोटो
| Edited By: Anish Bendre | Updated on: Oct 04, 2021 | 3:23 PM
Share

मुंबई: बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणी एनसीबीने अटक केली आहे. त्यामुळे या रेव्ह पार्टीची एकच चर्चा सुरु झाली असून या रेव्ह पार्टीतील एक्स्क्लुझिव्ह व्हिडीओ हाती लागला आहे. अथांग समुद्रात जहाजावर ही पार्टी तीन दिवस रंगणार होती. मात्र, त्याआधीच एनसीबीने हा बेत उधळून लावला आहे.

Cordila Cruise Party

क्रुझवरील पार्टीचा फोटो

अशी रंगणार होती पार्टी:

दिवस पहिला:

मायामीमधला डीजे स्टेन कोलेवसोबत डीजे बुल्सआय, ब्राऊनकोट आणि दीपेश शर्माचा कार्यक्रम

दिवस दुसरा:

दुपारी 1 पासून ते रात्री 8 पर्यंत फॅशन टीव्हीच्या पूल पार्टीचं आयोजन. पूल पार्टीदरम्यान आयव्हरी कोस्टचा डीजे राऊलसोबत भारतीय डीजे कोहराचा कार्यक्रम. रात्री 8 नंतर फॅशन टीव्ही पाहुण्यांसाठी शँपेन ऑल-ब्लॅक पार्टीचं आयोजन. रात्री 10 ते सकाळी 7 पर्यंत स्पेस मोशन आणि इतर कलाकारांचा संगीत कार्यक्रम.

तिसरा दिवस:

तिसऱ्या दिवशी म्हणजे 4 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता क्रूझ मुंबईत परतणार होतं.

आर्यनकडे कोणतेही आमंत्रण नाही

एनसीबीच्या सूत्रांनुसार, जर आर्यनला या कार्यक्रमात अतिथी म्हणून आमंत्रित केले गेले असेल, तर त्याला यासाठी काही आमंत्रण किंवा काही प्रकारचा प्रस्ताव असायला हवा होता. परंतु त्याच्याकडे असे कोणतेही आमंत्रण किंवा प्रस्ताव नाही. तो फक्त असे म्हणत आहे की त्याला आमंत्रित केले गेले होते, मग ते कोणी केले, तो योग्य प्रकारे सांगू शकला नाही आणि अरबाजला प्रत्येक गोष्टीची माहिती होती असे म्हणत तो टाळत आहे.

बोर्डिंग पास शिवाय आर्यनला एंट्री देणारा कोण होता, कोणी त्याला आमंत्रित केले होते, हे एनसीबी तपासत आहे. हेच कारण होते की एनसीबीने प्राथमिक चौकशीच्या आधारावर त्याची 2 दिवसाची कस्टडी मागितली

ड्रग्ज सापडले नाही, पण व्हॉट्सअॅप चॅट

एनसीबीच्या सूत्रांनुसार आर्यन चेक इन करत असताना त्याला ताब्यात घेण्यात आले. अरबाजच्या शूजच्या सोलमध्ये ड्रग्ज लपवून आणली गेली होती, जरी आर्यनच्या खिशातून किंवा पिशवीतून ड्रग्ज सापडली नसली, तरी ती ड्रग्ज फक्त आर्यन, अरबाज आणि त्यांच्या साथीदारांच्या वापरासाठी आणली गेली होती, याचा पुरावा आर्यन आणि अरबाजच्या व्हॉट्सअॅप चॅटमध्ये सापडला आहे, ज्यामध्ये आर्यन अरबाज मर्चंटला ड्रग आणण्यास सांगत असल्याचे आढळून आले आहे.

एनसीबी आजही आर्यन खानसाठी कस्टडी मागणार : समीर वानखेडे

एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी म्हटले आहे की, एनसीबी अजूनही आर्यन खानसाठी कस्टडी मागेल. तशी मागणी आम्ही किला कोर्टात करणार आहोत. ते म्हणाले- ‘काल संध्याकाळी झालेल्या चौकशीसंदर्भात आणि निष्कर्षासंदर्भात मी काहीही प्रसारमाध्यमांना सांगू शकत नाही, परंतु आम्हाला यात अधिक तपास करण्याची गरज आहे.’

आम्ही बॉलिवूडला टार्गेट करत नाही

बॉलिवूड सेलिब्रिटींविरोधात सातत्याने कारवाई करण्यासाठी ओळखले जाणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. “असं अनेकवेळा घडलं आहे की आमच्यावर आरोप झाले आहेत की आम्ही बॉलिवूडला टार्गेट करत आहोत, पण कोणाच्याही आरोपांवर बोलण्याऐवजी आम्ही तथ्यांवर बोलतो आणि आकडेवारीवरही जास्त बोलतो. गेल्या वर्षी, आम्ही 10 महिन्यांत एकूण 105 लोकांवर गुन्हे दाखल केले, तुम्ही सांगा यापैकी किती सेलिब्रिटी होते? या वर्षी देखील आम्ही 310 लोकांना अटक केली आहे, त्यापैकी किती सेलिब्रिटी आहेत? आम्ही 150 कोटी रुपयांची औषधे जप्त केली आहेत पण त्यावर कोणी बोलत नाही.”

आर्यन खान ढसाढसा रडला

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्यनने चौकशी दरम्यान कोठडीत कबूल केले आहे की तो गेल्या चार वर्षांपासून ड्रग्ज घेत होता. त्याने केवळ भारतातच नाही तर दुबई, यूके आणि इतर अनेक देशांतही अंमली पदार्थांचे सेवन केले आहे. चौकशीत असे समोर आले आहे की अरबाज मर्चंट देखील आर्यनसोबत सतत ड्रग्ज घेत होता. चौकशीदरम्यान आर्यन सतत रडत असल्याचेही समोर आले आहे. एनसीबीने आर्यनला फोनवर शाहरुखशी बोलण्याचीही मुभा दिली होती. शाहरुख खान आणि गौरी खान यांना त्यांचा मुलगा ड्रग्स घेत असल्याची माहिती असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.

भारताबाहेर यूके, दुबईतही ड्रग्सचे सेवन

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुखच्या ‘मन्नत’ या बंगल्यातही सर्च ऑपरेशनसाठीही टीम तयार आहे. आर्यनच्या अटकेनंतर, कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याच्या लँडलाईन फोनवरुन शाहरुख खानशी सुमारे 2 मिनिटे बोलण्यास दिले. मिळालेल्या माहितीनुसार, आर्यन खान चौकशीदरम्यान सतत रडत होता. त्याने भारताबाहेर यूके, दुबई आणि इतर देशांमध्ये ड्रग्सचे सेवन केले आहे.

‘मन्नत’मध्येही सर्च ऑपरेशन

शाहरुख खान आपली पत्नी गौरी आणि मुलं आर्यन, सुहाना आणि अबराम यांच्यासोबत आपल्या सहा मजली मन्नत बंगल्यामध्ये राहतो. मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात समुद्रासमोरच प्राईम लोकेशनला हा बंगला आहे. काही महत्त्वाच्या दिवशी शाहरुखचे चाहते त्याच्या घराबाहेर त्याला शुभेच्छा देण्यासाठी जमा होतात. ईद, दिवाळी किंवा होळीसारख्या सणांच्या दिवशीही शाहरुख बाल्कनीमध्ये येऊन आपल्या चाहत्यांना शुभेच्छा देतो. हे पर्यटकांसाठीही आकर्षणाचे केंद्र आहे. या बंगल्याची किंमत सध्याच्या बाजारभावानुसार दोनशे कोटी रुपयांच्या घरात आहे.

‘मन्नत’वर छापेमारीची शक्यता का?

शाहरुखचा मुलगा आर्यनचा सर्वात जवळचा मित्र अरबाज मर्चंट कुठून ड्रग्ज आणायचा याची माहिती एनसीबीला मिळाली आहे. या प्रकरणात अजूनही छापे टाकले जात आहेत आणि मोठ्या अटकेची अपेक्षा आहे. एनसीबीचे छापे दिल्लीत सुरु असून एक टीम गोमित चोप्राच्या घरीही पोहोचली आहे. NCB च्या सूत्रांनुसार अटक प्रक्रियेनंतर, NDPS कायद्यातील तरतुदींनुसार प्रत्येक आरोपीच्या घरात शोध मोहीम घेण्याचीही तरतूद आहे, अशा परिस्थितीत NCB मुंबईत सुपरस्टार शाहरुख खानचे घर मन्नतमध्ये सर्च मोहीम राबवेल असे मानले जात आहे.

पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :

संजय दत्त ते रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुखच्या पोराची केस लढणारे कोण आहेत सतीश मानशिंदे?

कोण आहे अरबाझ मर्चंट ज्याचं ड्रग्जकांडमध्येही नाव आणि शाहरुखची मुलगीही करते फॉलो?

शाहरुखच्या मानगुटीवर ते वानखेडे ते आताचे हे वानखेडे, का होतोय फोटो व्हायरल?

Follow Us
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
12 तारखेनंतर गंभीर परिणाम होतील; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, थेट...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना...
टेंभी नाक्याच्या दहीहंडीत एकनाथ शिंदेंची उपस्थिती; गोविंदा पथकांना दिला खास संदेश
जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले
Dattatray Bharne On Maratha vs OBC | जरांगे-भुजबळांच्या भूमिकांवर दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य! म्हणाले, राजकारण नको...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने...
MPSC पेपरफुटी प्रकरणाची धागेदोरे नरहरी झिरवळांपर्यंत? त्यांच्या OSD ने दिली सर्वात मोठी माहिती