शाहरुखच्या मानगुटीवर ते वानखेडे ते आताचे हे वानखेडे, का होतोय फोटो व्हायरल?

आर्यन ज्या पार्टीमध्ये सामील झाला होता, तेथे ड्रग्जसुद्धा सापडलेले आहे. ही कारवाई अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृ्त्वात पार पडली आहे. समीर यांचे नाव समोर आल्यानंतर आता जिथे वानखेडे तिथे शाहरुख आडचणीत असे आता एक गणितच होऊन गेल्याची सोशल मीडियावर चर्चा आहे.

शाहरुखच्या मानगुटीवर ते वानखेडे ते आताचे हे वानखेडे, का होतोय फोटो व्हायरल?
shah rukh khan
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Oct 04, 2021 | 12:44 AM

मुंबई : किंग खान म्हणजेच शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला रेव्ह पार्टी-ड्रग्ज प्रकरणी अमली पदार्थविरोधी पथकाने अटक केलं आहे. आर्यनच्या अटकेनंतर चित्रपटसृष्टी तसेच संपूर्ण भारतात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे आर्यन ज्या पार्टीमध्ये सामील झाला होता, तेथे ड्रग्जसुद्धा सापडलेले आहेत. ही कारवाई अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृ्त्वात पार पडली आहे. समीर यांचे नाव समोर आल्यानंतर आता जिथे वानखेडे तिथे शाहरुख आडचणीत, असे आता एक गणितच होऊन गेल्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात वानखेडे नावाचे अधिकारी

सध्या आर्यन खानला एका दिवसाची कोठडी किला न्यायालयाने सुनावली आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर आर्यनला आपली रात्र कोठडीत घालवावी लागणार आहे. एनसीबीला या हाय प्रोपाईल रेव्ह पार्टी आणि ड्रग्जची माहिती कशी मिळाली हे सर्वांनाच जाणून घ्यायचे आहे. ही कारवाई अमली पदार्थ नियंत्रण कक्षाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. यावेळी समीर वानखेडे यांच्यामुळे शाहरुख अडचणीत आला आहे. यापूर्वीदेखील शाहरुख आयपीएलच्या सामन्यांदरम्यान मुंबईतील वानखेडे स्टेटीयमवर केलेल्या कृतीमुळेच अडचणीत आला होता. शाहरुखला वानखेडे स्टेडियमवर येण्यास बंदी घालण्यात आली होती. तसेच त्याच्याविरोधात  अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला होता.

पाहा फोटो

SHAH RUKH KHAN WANKHEDE

सध्या हा फोटो व्हायरल होत आहे.

खरंच जिथे वानखेडे तिथे शाहरुख अडचणीत ?

सोशल मीडियावर सध्या शाहरुख आणि वानखेडे या दोन नावांना घेऊन वेगवेगळी चर्चा होत आहे. नेटकरी जिथे वानखेडे तिथे शाहरुख अडचणीत असे म्हणत आहेत. तसे काही मीम्स आणि फोटोदेखील व्हायरल होत आहेत. वानखेडे नावाच्या अधिकाऱ्यामुळेच शाहरुख सध्या अडचणीत आलाय. तर 2012 साली आयपीएल सामन्यांच्या दरम्यान मुंबई येथील वानखेडे स्टेडियमवरच शाहरुख खानने एका सुरक्षा रक्षकाशी वाद घातला होता. या दोन्ही ठिकाणी शाहरुखसोबत वानखेडे हे नाव आलेले आहे. कदाचित याच कारणामुळे जिथे वानखेडे तिथे शाहरुखच्या अडचणी वाढल्या असे नेटकरी म्हणत आहेत. शाहरुखच्या मानगुटीवर वानखेडे हे नाव असल्याची चर्चा सोशल मीडियावर रंगलीय.

इतर बातम्या :

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

Aryan Khan drug case | रेव्ह पार्टी-ड्रग्ज प्रकरणात आर्यन खान एनसीबीच्या ताब्यात, चर्चा मात्र एका वेगळ्या फोटोची, नेमका प्रकार काय ?

Video | 10 सेकंदाचा थरार, छोट्या मुलाचा स्टंट एकदा पाहाच !

(aryan khan arrested by ncb under sameer wankhede officer shah rukh khan was banned on wankhede stadium photo went viral)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें