शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय-काय घडलं?
Follow us
| Updated on: Oct 03, 2021 | 8:31 PM

मुंबई : शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एनसीबीच्या वकिलांनी या आरोपींची दोन दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र कोर्टानं या तीन आरोपींना एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली आहे. आता उर्वरित पाच आरोपींना पोलीस कोर्टात कधी हजर करतात हे पाहावं लागणार आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ वकील सतीश माने-शिंदे यांनी कोर्टात आर्यनची भूमिका मांडली.

एनसीबीला चौकशीसाठी फक्त एक दिवस मिळाला

एनसीबीने अरबाज खानसह त्याच्या साथीदार अरबाज मर्चंट आणि मुनमुन या आरोपींची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र किला कोर्टाने केवळ एक दिवसाची कोठडी मान्य केली आहे. त्यामुळे एनसीबीला आता चौकशीसाठी फक्त एक दिवस मिळाला आहे. एनसीबी एक दिवसाच्या कोठडीत काय तपास करते, त्या तपासातून एनसीबीच्या हाती नेमकं काय लागतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ड्रग्ज प्रकरणाच्या लिंक कुठपर्यंत जातात ते आता तपासातून समोर येईल.

विशेष म्हणजे तीनही आरोपी एकमेकांना ओळखतात. त्यांच्यामध्ये पैशांचे व्यवहार झालेले आहेत. त्यामुळे हे सगळे ड्रग्ज त्यांच्याकडे कुठपर्यंत आले, कुणाच्या माध्यमातून आले? याचा तपास करण्यासाठी एनसीबीने दोन दिवसाच्या कस्टडीची मागणी केली होती. पण कोर्टाने एका दिवसाची कस्टडी सुनावली आहे. उर्वरित पाच आरोपींना एनसीबी कदाचित उद्या हजर करण्याची शक्यता आहे.

आर्यनच्या वकिलांचा कोर्टात नेमका युक्तीवाद काय?

“आर्यनकडे बोर्डिंग पासही नव्हता. त्याला त्या पार्टीचं निमंत्रण आलं होतं. तसेच त्याच्याकडे कोणत्याही पद्धतीचं ड्रग्स सापडलं नाही. त्यामुळे दोन दिवसांची कस्टडी न देता एकाच दिवसाची कस्टडी द्यावी”, असा युक्तीवाद वकील सतिश माने-शिंदे यांनी कोर्टात केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना एक दिवसांची कोठडी सुनावली.

पार्टीत कोकेन, एमडी, चरस सारखे ड्रग्स

एनसीबी अधिकाऱ्यांना कोकेन, एमडी, चरस सारखे ड्रग्स पार्टीत मिळाले आहेत. त्यामुळे तपासासाठी दोन दिवसांची कस्टडी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मागितली होती. आजच्या चौकशीत नेमकी काय माहिती बाहेर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच त्याच माहितीच्या आधारे एनसीबी आणखी कोठडी मागण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित पाच आरोपींनाही उद्या नियमित न्यायालयात हजर केलं जाईल. त्यांचा नेमका रोल काय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

हेही वाचा :

Mumbai NCB Raid: रेव्ह पार्टीची इन्स्टावर जाहिरात, तीन दिवस कशी रंगणार होती पार्टी?; वाचा सविस्तर

शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान…

सुपरस्टार शाहरुखचा मुलगा आर्यन खान अखेर अटकेत, इतर 8 जणांवरही कारवाई, आता पर्याय काय?

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.