AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोण आहे अरबाझ मर्चंट ज्याचं ड्रग्जकांडमध्येही नाव आणि शाहरुखची मुलगीही करते फॉलो?

Who is Arbaaz Khan | एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी क्रुझवरून ताब्यात घेतल्यानंतर आर्यन खानसह सर्वांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. यावेळी अरबाझ मर्चंटच्या फोनमधील कॉल आणि Whatsapp Chat ची तपासणी केली असता त्यामधून ड्रग्ज कनेक्शनचे बरेच धागेदोरे समोर आले आहेत.

कोण आहे अरबाझ मर्चंट ज्याचं ड्रग्जकांडमध्येही नाव आणि शाहरुखची मुलगीही करते फॉलो?
अरबाझ मर्चंट
| Edited By: | Updated on: Oct 04, 2021 | 6:33 AM
Share

मुंबई: अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज पार्टी प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याची चौकशी केली जात आहे. याप्रकरणात आर्यन खानसोबत अटक करण्यात आलेल्या आठ जणांमध्ये अरबाझ मर्चंट याचाही समावेश आहे. अरबाझ मर्चंट हाच आर्यन खानला क्रुझवर घेऊन गेल्याचे सांगण्यात येते. अरबाझ मर्चंट हा एरवीही ड्रग्ज पार्ट्यांमध्ये जात असल्याची माहिती आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी क्रुझवरून ताब्यात घेतल्यानंतर आर्यन खानसह सर्वांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले होते. यावेळी अरबाझ मर्चंटच्या फोनमधील कॉल आणि Whatsapp Chat ची तपासणी केली असता त्यामधून ड्रग्ज कनेक्शनचे बरेच धागेदोरे समोर आले आहेत.

कोण आहे अरबाझ मर्चंट?

अरबाझ मर्चंट हा आर्यन खान आणि सुहाना खान यांचा मित्र आहे. इन्स्टाग्रामवरही त्याची बऱ्यापैकी फॅन फॉलोइंग आहे. तो अनेकदा स्टार किडसच्या पार्ट्यांमध्ये दिसून आला आहे. अरबाझ मर्चंट हा मध्यंतरी पूजा बेदीची मुलगी अलाया एफ हिला डेट करत असल्याचीही चर्चा होती.

आर्यनच्या वकिलांचा कोर्टात नेमका युक्तीवाद काय?

आर्यन खानला रविवारी मुंबईच्या किला कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी आर्यन खानच्या वकिलांकडून त्याची बाजू मांडण्यात आली. आर्यनकडे बोर्डिंग पासही नव्हता. त्याला त्या पार्टीचं निमंत्रण आलं होतं. तसेच त्याच्याकडे कोणत्याही पद्धतीचं ड्रग्स सापडलं नाही. त्यामुळे दोन दिवसांची कस्टडी न देता एकाच दिवसाची कस्टडी द्यावी, असा युक्तीवाद वकील सतिश माने-शिंदे यांनी कोर्टात केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना एक दिवसांची कोठडी सुनावली.

एनसीबीचं म्हणणं काय?

एनसीबीने अरबाझ खानसह त्याच्या साथीदार अरबाज मर्चंट आणि मुनमुन या आरोपींची दोन दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र किला कोर्टाने केवळ एक दिवसाची कोठडी मान्य केली आहे. त्यामुळे एनसीबीला आता चौकशीसाठी फक्त एक दिवस मिळाला आहे. विशेष म्हणजे तीनही आरोपी एकमेकांना ओळखतात. त्यांच्यामध्ये पैशांचे व्यवहार झालेले आहेत. त्यामुळे हे सगळे ड्रग्ज त्यांच्याकडे कुठपर्यंत आले, कुणाच्या माध्यमातून आले? याचा तपास करण्यासाठी एनसीबीने दोन दिवसाच्या कस्टडीची मागणी केली होती. पण कोर्टाने एका दिवसाची कोठडी सुनावली आहे. उर्वरित पाच आरोपींना एनसीबी सोमवारी कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

‘कभी खुशी कभी गम’मधून डेब्यू ते ताईक्वांदोत सुवर्ण, NCB च्या ताब्यात असलेल्या आर्यन शाहरुख खानविषयी सर्वकाही

शाहरुख खानच्या मुलाला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली प्रतिक्रिया, आर्यन खान…

सैफची मुलगी ते शाहरुखचा मुलगा, ड्रग्ज प्रकरणात NCB च्या गळाला लागलेल्या बॉलिवूड सेलिब्रिटींची यादी

पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.