
मुंबईः मुंबईतील उच्च न्यायालयाजवळ (Mumbai High Court) नायजेरियन व्यक्तीकडून काही नागरिकांवर हल्ला (Attack civilians by a Nigerian man) केल्याची घटना आज घडली. नायजेरियन व्यक्तीकडून उच्च न्यायालयाजवळच हल्ला करण्यात आल्याने नागरिकांमध्ये गोंधळ उडाला. या हल्ल्यात आठ ते नऊ जण जखमी (Eight to nine people injured) झाले असून हल्लेखोर व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उच्च न्यायालयाजवळ एका नायजेरियन व्यक्तीकडून हत्याराने आठ ते नऊ जणांवर अचानकपणे हल्ला करण्यात आल्याने काही काळ गोंधळ उडाला.
या हल्ल्यात अमोल मोरे ही व्यक्ती जखमी झाली असून त्यांच्या मानेवर त्या व्यक्तिने हल्ला केला होता, मात्र त्यांनी बचावासाठी आपला हात मध्ये घातला त्यामुळे मानेला गंभीर दुखापत झाली नसल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई उच्च न्यायालयाजवळ दुपारी मोठ्या प्रमाणात गर्दी होती. त्यावेळी अचानक एका नायजेरियन व्यक्तिकडून त्या ठिकाणी असलेल्या नागरिकांवर हत्याराने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आठ ते नऊ जण जखमी झाले असून हल्लेखोर नायजेरियन व्यक्तिला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मात्र पोलिसांनी हल्ला करताना त्याला ताब्यात घेत असतानाच त्याच्याकडून पोलिसांवरही हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली होती.
या प्रकरणाची पोलीस चौकशी करत असून या हल्ल्यातील व्यक्तींचीही विचारपूसही पोलिसांनी केली आहे. नायजेरियन व्यक्ती प्रकरणाची तपास मुंबई पोलीस करत आहेत. न्यायालयाजवळ हल्ला करण्यात आल्याने पोलिसांचीही काही काळ तारांबळ उडाली होती. हत्याराने हल्ला करण्यात आल्याने घटनास्थळी रक्त सांडले होते. या प्रकरणी त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडे हत्यार आले कुठून याचा तपासही पोलीस करत आहेत.
ज्या नायजेरियन व्यक्तीकडून हल्ला करण्यात आला आहे, त्याच्या हातात असणारे हत्यार कुठून आले किंवा त्याला ते दिले कुणी याचा तपासही पोलीस करत आहेत. त्याने गर्दीच्या ठिकाणी अचानकपणे का हल्ला केला, त्याच्याकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला असल्याने त्याच्या हल्ल्यात काही पोलीस जखमी झाले आहेत.