AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

4 वेळा मिसकरेज, पाचव्यांदा बाळाचा जन्म, पण बाळ 8 महिन्यांचं होताच आईची बाळासह आत्महत्या!

Mother Suicide with 8 months Baby : म्हैसूर इथं घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरुन गेलाय.

4 वेळा मिसकरेज, पाचव्यांदा बाळाचा जन्म, पण बाळ 8 महिन्यांचं होताच आईची बाळासह आत्महत्या!
हॉस्पिटलने चुकून बदलले नवजात बालकImage Credit source: TV9 Marathi
| Updated on: Jun 01, 2022 | 5:38 PM
Share

पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad Suicide News) बाहुल्याला फाशी देत आठ वर्षांच्या मुलानं गळाफास लावून आत्महत्या केली. ही घटना ताजी असतानाचा आता आणखी एक धक्कादायक आत्महत्या उघडकीस आली आहे. एका आईनं आपल्या आठ वर्षांच्या निष्पाप मुलासह (Mother suicide with 8 month year old baby) स्वतःला पेटवून दिलं. या धक्कादायक घटनेत निष्पाप बाळासह आईचाही होरपळून दुर्दैवी अंत झाला. या आईनं उचललेलं टोकाचं पाऊल जितकं अंगावर काटा आणणारं आहे, तितकंच तिच्या आत्महत्येचं कारणही तितकंच हादरवून टाकणारं आहे. कर्नाटकातून (Karnataka News) हृदय हेलावणारी घटना समोर आली आहे. 31 मे रोजी एका महिलेनं आपल्या 8 महिन्यांच्या बाळासह जीव दिलाय. ही घटना कर्नाटकच्या म्हैसूर इथं घडली. आत्महत्या करणाऱ्या महिलेचं नाव सिंधू असून तिचं वय 24 वर्ष आहे. सिंधूचं चार वेळा मिसकरेज (गर्भपात) झाला होता. पाचव्यांदा तिला बाळ झालं. पण या बाळासह सिंधूने स्वतःला पेटवून घेतलं आणि आपली जीवनयात्रा संपवली.

म्हैसूरच्या दानसूर इथं ही धक्कादायक घटना घडली. आत्महत्या करणारी महिली पीटीएसटी या आजारनं ग्रासली होती. या महिलेवर मानसिक संतुलन बिघडलं होतं. गेल्या वर्षी या महिलेनं एका बाळाला जन्म दिला. त्याआधी या दाम्पत्याला एकही संतान नव्हती. हे बाळ जन्माला येण्याआधी सिंधू चार वेळा गर्भवती राहिली होती.

पण चारही वेळा तिच्या प्रसूतीवेळी बाळ दगावलं होतं. यामुळे सिंधूचं मानसिक संतुलन बिघडलं होतं. तिच्या मनावर मोठा आघात झाला होता. दरम्यान, गेल्या वर्षी तिला संतानप्राप्ती झाली. पण आठ महिन्यांच्या आपल्या चिमुरड्या जिवासह तिनं स्वतःही जीव दिल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली होती.

मंगळवारी रात्री (31 मे) रोजी आत्महत्येची ही घटना घडली. घरात कुणी नसताना या महिलेनं आत्महत्येसारखं टोकाचं गंभीर पाऊल उचललं. दरम्यान, आत्महत्या केल्याचं कळल्यानंतर या महिलेला म्हैसूरच्या के आर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं, पण तिथं या महिलेला मृत घोषित करण्यात आलं.

पाहा व्हिडीओ :

म्हैसूर इथं घडलेल्या या घटनेनं संपूर्ण परिसर हादरुन गेलाय. दरम्यान, स्थानिक पोलीस स्थानकात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.