AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pimpri Chinchwad News: बाहुलीला फाशी दिल्यानंतर 8 वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या! पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना

Pimpari Chinchwad Crime News : ही घटना उघडकीस आल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय.

Pimpri Chinchwad News: बाहुलीला फाशी दिल्यानंतर 8 वर्षीय मुलाची गळफास घेत आत्महत्या! पिंपरी-चिंचवडमधील धक्कादायक घटना
हैदराबादमध्ये पार्टीला गेलेल्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचारImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jun 01, 2022 | 3:05 PM
Share

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडमध्ये (Pimpri Chinchwad Crime) बाहुलीला फाशी दिल्यानंतर आठ वर्षीय (8 year old boy commits suicide) मुलाने स्वतः ही आत्महत्या केली. मुलाने स्वतःही तोंडावर तसाच कापड टाकलं अन मग गळफास घेतला. या धक्कादायक घटनेनं संपूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ माजली आहे. दोन दिवसांपूर्वी ही धक्कादायक घटना थेरगावमध्ये (Thergaon, Pimpri Chinchwad News) घडली. ज्या सोसायटीच्या पायऱ्यांखाली ते राहतात, त्याच सोसायटीच्या गेटवर वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करत आहेत होते. आई तिथंच बाहेर होती. त्यावेळी घरात ही घटना घडली. ही घटना उघडकीस आल्यानंतर सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय.

नेमकं काय घडलं?

आर्यन (बदललेलं नाव) हा आठ वर्षांचा मुलगा घरात बाहुल्यांसोबत खेळत होता. यावेळी घरात त्याची आईदेखील होती. मुलगा बाहुल्यांसोबत खेळत असल्यानं आई कामात व्यस्त राहिली. बराचवेळ मुलाचा काही खेळण्याचा आवाज आला नाही, म्हणून आईनं डोकावून मुलाकडे पाहिलं. तेव्हा आईला मुलगा खिडकीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तर त्याच्या बाहुलीला त्यानं टॉवेलनं फाशी दिली होती.

हॉरर सिनेमे बघण्याची सवय

दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर संपूर्ण थेरगाव हादरुन गेलं होतं. पोलीसमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आर्यनला हॉरर चित्रपट पाहण्याची सवय होती. त्यातून त्यानं खेळता खेळता आपल्या बाहुलीला फाशी दिली. टॉवेलने बाहुलीला फाशी दिल्यानं बाहुली मेल्याचं आर्यनला वाटलं. यातून दुःख होऊन त्यानं स्वतःही खिडकीला गळफास लावून घेत आपलं आयुष्य संपवलंय.

पाहा व्हिडीओ : पुण्यातील खळबळजनक घटना

आठ वर्षांच्या लहान मुलानं आत्महत्येनं आर्यनच्या आई वडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून संपूर्ण परिसरालाच धक्का बसलाय. या मुलाची आई गृहिणी असून वडील सुरक्षा रक्षक म्हणून काम करतात.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.