मुंबईच्या या भागात फटाके आणि आतीषबाजीवर निर्बंध, या तारखेपर्यंत आदेश केले लागू

पोलीस प्रशासनाने सार्वजनिक ठिकाणी फटाके आणि आतिषबाजीवर बंदी घालणारा आदेश सार्वजनिक ठिकाणी प्रदर्शित करण्याचे आणि ध्वनीक्षेपकांद्वारे त्याची प्रसिद्धी करण्याचेही निर्देश दिले आहेत.

मुंबईच्या या भागात फटाके आणि आतीषबाजीवर निर्बंध, या तारखेपर्यंत आदेश केले लागू
diwali firecrackers
| Updated on: Nov 03, 2026 | 8:02 PM

मुंबईतील चेंबूरच्या माहुल भागात फटाक्याच्या आतिषबाजीवर निर्बंध लावण्यात आले आहे. माहुल स्थित भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL)च्या रिफायनरी तसेच बॉटलिंग प्लांटच्या आसपासची सुरक्षा पाहून मुंबई पोलिसांनी येथे फटाके आणि आतीषबाजी करण्यास मनाई केली आहे.

पोलिस उपायुक्त (ऑपरेशन) तसेच कार्यकारी दंडाधिकारी अकबर पठाण यांनी जारी केलेल्या आदेशानुसार ३ नोव्हेंबर २०२६ ते २ डिसेंबर २०२६ पर्यंत ( दोन्ही दिवसांचा समावेश ) संबंधित फटाक्यांवरील निर्बंध लागू असणार आहेत. आदेशानुसार बॉटलिंग प्लांटच्या बफर झोनपासून ५०० मीटर पुढे कोणीही फटाके फोडू शकणार नाही, न रॉकेट वा अन्य आतिषबाजी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

Loading...

या भागात प्रतिबंध

BPCL आणि HPCL रिफायनरीच्या बाहेरील प्रतिबंधीत क्षेत्र

माहुल टर्मिनल क्षेत्र

BPCL चे BDU प्लांट क्षेत्र

HPCL चे BDU प्लांट क्षेत्र

15 आणि 50 एकर क्षेत्राच्या मागील स्पेशल ऑईल रिफायनरीपर्यंत इलाका

पोलिस प्रशासनच्या वतीने या आदेशाला सार्वजनिक स्थानांवर फलक करुन लावण्यात आला आहे. तसेच लाऊड स्पिकर आणि मेगाफोनच्या माध्यमातून प्रसार करण्याचे निर्देश दिले आहे.

प्रदुषण मुक्त दिवाळी संदर्भातील अभिनेत्री दीया मिर्झा हीचा व्हिडीओ

मुंबई महानगर पालिकेच्या पर्यावरण अनुकूल दिवाळीच्या प्रसारासाठी अभिनेत्री दीया मिर्झा यांचा प्रसारित केलेल्या व्हिडीओवरुन वाद निर्माण झाला आहे. भाजपाच्या एका नेत्याच्या आक्षेपानंतर हा व्हिडीओ हटवण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी देखील या व्हिडीओला हिंदू विरोधी म्हटले आहे.

भाजपाचे मुंबईचे अध्यक्ष अमित साटम यांनी एक्सवर बीएमसीच्या अधिकृत खात्याला टॅग करत केलेल्या पोस्टमधून दीया मिर्झा हीच्या व्हिडीओवर टीका केली होती. त्यानंतर या व्हिडीओ पालिकेने हटवले होते. अमित साटम यांनी दीया मिर्झाकडून आम्हाला ही शिकायची गरज नाही की दिवाळी कशी साजरी करायची.

दीया मिर्झाच्या व्हिडीओत प्रदुषण दूर करण्याचे अपिल

मुंबईतील वाढत्या वायू प्रदुषणाची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतल्यानंतर पालिकेने लोकांना फटाक्यांपासून दूर राहण्याचे आणि पर्यावरण अनुकूल दिवाळी साजरी करण्याचे अपिल केले होते. या मोहिमेअंतर्गत बीएमसीने दीया मिर्झा सह अनेक नामी गिरामी व्यक्तींना या प्रचार मोहिमेसाठी घेतले होते. दीया मिर्झा हीने व्हिडीओ लोकांना ध्वनी आणि वायू प्रदुषणापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us