AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वांद्र्यात बुलडोझर कारवाई, दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज, धरपकड

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर मुंबईतल्या वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्यास पश्चिम रेल्वेकडून सुरुवात झाली आहे. या अतिक्रम हटाव मोहिमेला विरोध होत असून, या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे.

वांद्र्यात बुलडोझर कारवाई, दगडफेक, पोलिसांचा लाठीचार्ज, धरपकड
अतिक्रम हटाव मोहिमेदरम्यान दगडफेक Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 20, 2026 | 6:18 PM
Share

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर मुंबईतल्या वांद्रे रेल्वे परिसरातील अतिक्रमण हटवण्यास पश्चिम रेल्वेकडून सुरुवात झाली आहे. या अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध होत असून, या परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे, काही जणांनी पोलिसांच्या दिशेनं बाटल्या फेकल्या त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी याठिकाणी सौम्य लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली आहे. वांद्रे येथील गरीब नगर झोपडपट्टीवर पश्चिम रेल्वेकडून कोर्टाच्या आदेशानंतर बुलडोजर कारवाई सुरू झाली आहे.  अतिक्रम हटाव मोहीम सुरू असताना स्थानिक नागरिक चांगलेच आक्रमक झाले आहेत. स्थानिकांकडून पोलिसांवर आधी बाटल्या फेकण्यात आल्या, त्यानंतर दगडफेकही करण्यात आली. या घटनेत काही पोलीस जखमी झाल्याची माहिती देखील समोर येत आहे. स्थानिकांनी दगडफेक केल्यानंतर पोलिसांकडून दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेमुळे चांगलाच गोंधळ उडाला आहे.

दगडफेक करणारे ताब्यात 

दरम्यान अतिक्रम हटाव मोहीम सुरू असताना, स्थानिकांनी अतिक्रम हटवण्यास विरोध केला. आधी स्थानिकांकडून पोलिसांवर बाटल्या फेकण्यात आल्या, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आधी सौम्य लाठीचार्ज केला.  त्यानंतर स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक केली, या घटनेनंतर पोलिसांकडून पुन्हा लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांनी दगडफे करणाऱ्यांना ताब्यात घेतलं आहे.

पश्चिम रेल्वेच्या सीपीआरओची प्रतिक्रिया 

दरम्यान अतिक्रमण हटवण्याची मोहीम काल सकाळी सुरू झाली आणि दिवसभर सुरू होती. ५०० अतिक्रमणे हटवली जातील. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, १०० भाग पाडण्यात येणार नाहीत. आज सकाळी ८ वाजल्यापासून ही मोहीम सुरू आहे. येथे १२०० कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. आरपीएफ, जीआरपी आणि शहर पोलिसांचे कर्मचारी तैनात आहेत. लोकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आम्ही मदत करत आहोत. लोकांना त्यांचे सामान इतर ठिकाणी हलवण्यासाठी वेळ दिला जात आहे. येथील सर्व रहिवाशांना कोणताही त्रास होणार नाही,  त्यांना पाणी आणि अन्नही पुरवले जात आहे. आम्ही उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत आहोत. आतापर्यंत ६० टक्के मोहीम पूर्ण झाली आहे. आज अधिक यंत्रसामग्री बसवण्यात आली आहे. उद्ध्वस्तीकरण प्रक्रियेला गती देण्यासाठी १३ पेक्षा जास्त यंत्रे बसवण्यात आली आहेत. ही मोहीम आज संध्याकाळपर्यंत सुरू राहील. ही पाच दिवसांची मोहीम आहे, पण आम्ही अधिक वेगाने काम करत आहोत, अशी प्रतिक्रिया यावर पश्चिम रेल्वेचे सीपीआरओ विनीत अभिषेक यांनी दिली आहे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ