BJP vs MNS : भाजप VS मनसे, दादरमध्ये वातावरण तापलं, तेल लावलेले बांबू आहेत, तयारच आहोत आम्ही, मनसेचा इशारा

BJP vs MNS : अमित ठाकरे यांनी काल पुण्यात वसतीगृह अधीक्षकांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी असलेला पंतप्रधान मोदींचा फोटो हटवायला लावला. फोटो हटवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

BJP vs MNS : भाजप VS मनसे, दादरमध्ये वातावरण तापलं, तेल लावलेले बांबू आहेत, तयारच आहोत आम्ही, मनसेचा इशारा
Dadar
| Updated on: Sep 01, 2026 | 3:18 PM

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते अमित ठाकरे यांच्याविरोधात आज भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते माहीममध्ये आंदोलन करणार आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी शिवतीर्थाबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. पोलीस बंदोबस्ताबरोबरच मनसेचे कार्यकर्तेही शिवतीर्थाबाहेर जमले आहेत. मुंबईतल्या आजूबाजूच्या मनसैनिकांना शिवतीर्थाबाहेर जमण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. अमित ठाकरे यांनी काल पुण्यात वसतीगृह अधीक्षकांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोशेजारी असलेला पंतप्रधान मोदींचा फोटो हटवायला लावला. फोटो हटवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. म्हणून आज माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलन करणार आहेत.

शिवतीर्थ बाहेर आलेल्या संदीप देशपांडेंशी मीडियाने संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “भाजपचे कार्यकर्ते इथे येतील, पण जाणार नाहीत.मोदक, पूरणपोळी देणार. अमित ठाकरेंविरोधात निषेध आंदोलन करायचय तर आझाद मैदानात करा तिथे परवानगी दिली आहे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे” “फडणवीस साहेब म्हणाले की, आझाद मैदानात परवानगी आहे. आझाद मैदानात जाऊन आंदोलन करा. इथे येऊन आंदोलन करणार असाल तर आम्ही तयारच बसलो आहोत. तेल लावलेले बांबू आहेत” असं संदीप देशपांडे म्हणाले.

तर आम्ही आहोत आणि ते आहेत

ठाण्यातून आलेले मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले की, “मी संदीपला देशपांडेला भेटायला आलो आहे. हे जमलेले लोकं आहेत. बोलावलेले जमले तर शिवाजी पार्क कमी पडेल. भाजपं युवा मोर्चाला वाटत असेल शिवतीर्थ पर्यंत यावं तर त्यांचं वेलकम आहे. सरकार परवागनी देते, तशी त्यांना द्यावी. इथे परवानगी दिली, तर आम्ही आहोत आणि ते आहेत मग कितीपण फोर्स लावा” मनसे नेते संदीप देशपांडे, अविनाश जाधव, गजानन काळे, योगेश चिले, गजानन राणे सर्वच नेते आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांसहित शिवतीर्थावर पोहोचले आहेत

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us