AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Budget : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या, या विभागाला भरीव निधी मिळण्याची शक्यता

BMC Budget 2026-27 : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. यात पुढील क्षेत्रांनी भरीव निधी मिळण्याची शक्यता आहे.

BMC Budget : आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या, या विभागाला भरीव निधी मिळण्याची शक्यता
BMC BudgetImage Credit source: Google
| Updated on: Feb 24, 2026 | 4:51 PM
Share

मुंबई महापालिकेची निवडणूक अलिकडेच पार पडली आहे. या निवडणुकीत भाजपप्रणित महायुतीने शानदार विजय मिळवला. यानंतर महापौरपदी भाजपच्या रितू तावडे आणि उपमहापौरपदी शिवसेनेच्या संजय घाडी यांची निवड झाली आहे. त्यानंतर आता मुंबई पालिकेतील प्रशासक राज संपले आहे. त्यानंतर आता आशिया खंडातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या मुंबई महापालिकेचा 2026-27 चा अर्थसंकल्प उद्या सादर होणार आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

दुपारी दोन वाजता अर्थसंकल्प सादर होणार

समोर आलेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे हे शिक्षण समितीचा अर्थसंकल्प शिक्षण समितीच्या अध्यक्षा राजश्री शिरवाडकर यांच्याकडे सादर करतील. त्यानंतर दुपारी दोन वाजता महानगर पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी मुंबई महापालिकेसाठीचा वार्षिक अर्थसंकल्प स्थायी समितीचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांच्याकडे स्थायी समितीच्या सभागृहात सादर करणार आहेत. त्यानंतर दुपारी साडे तीन वाजता आयुक्त भूषण गगराणी यांची पत्रकार परिषद होणार आहे.

अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर दुपारी 4 वाजता पालिकेचं सभागृह असणार आहे. यात 10 नामनिर्देशित पालिका सदस्यांची नेमणूक केली जाणार आहे. तसेच वृक्ष प्राधिकरणाची स्थापना करुन त्यावर सदस्यांची नेमणूक करण्याबाबतचे तातडीचे कामकाज तहकूब करणे. विशेष समित्या पुनर्घटीत करणे आणि त्यावर सदस्यांची नेमणूक करण्याबाबतचा विषय तहकूब करणे. सल्लागार समित्या पुनर्घटीत करणे आणि त्यावर सदस्यांची नेमणूक करण्याबाबतचा विषय तहकूब करणे ही कामे केली जाणार आहेत.

80 हजार कोटींचा अर्थसंकल्प

गेल्या वर्षी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प 74 हजार कोटींचा होता, तो यंदा 80 हजार कोटींच्या घरात पोहोचण्याची शक्यता आहे. गेल्या 9 वर्षात महापालिकेचं बजेट तब्बल 50 हजार कोटींनी वाढलं आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात मुंबईतील रस्ते, पायाभूत सुविधा आणि मोठ्या प्रकल्पांना भरीव निधी दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच तिजोरीतील तूट भरुन काढण्यासाठी करवाढ आणि कचरा कर सारखे काही नवे कर लागू केले जाण्याची शक्यता आहे. तसेच महापालिकेच्या तिजोरीला लागलेली गळती नवे सत्ताधारी कसे रोखणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

अर्थसंकल्पात विभागांना भरीव निधी मिळण्याची शक्यता

  • रस्ते आणि वाहतूक
  • वर्सोवा ते दहिसर कोस्टल रोड
  • गोरेगाव-मुलुंड लिंक रोड
  • घनकचरा व्यवस्थापन आणि परिवहन
  • आरोग्य विभाग
  • पर्जन्य जलवाहिन्या
  • प्राथमिक शिक्षण
  • बेस्ट अनुदान
  • शिक्षण विभाग
  • प्रमुख रुग्णालये
  • उद्याने आणि प्राणिसंग्रहालये
  • कोळीवाड्यांच्या विकास
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...