AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC : मुंबईतील कोणत्याही शाळेचे खासगीकरण नाही, महापालिका शाळांची उत्तुंग भरारी; स्पेशल रिपोर्ट

School : बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही असं पालिकेने बजावून सांगितले आहे. तसेच मुंबईतील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मुद्द्यांवर प्रशासन संवेदनशील आहे असंही पालिकेने म्हटले आहे.

BMC : मुंबईतील कोणत्याही शाळेचे खासगीकरण नाही, महापालिका शाळांची उत्तुंग भरारी; स्पेशल रिपोर्ट
BMC SchoolImage Credit source: Google
| Updated on: Feb 23, 2026 | 6:32 PM
Share

बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून काही शाळांचे खाजगीकरण करण्यात आल्याचे बोलले जात होते. मात्र आता यावर पालिकेने उत्तर दिले आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही असं पालिकेने बजावून सांगितले आहे. तसेच मुंबईतील मराठी माध्यमांच्या शाळांच्या मुद्द्यांवर महानगरपालिका प्रशासन संवेदनशील आहे. मुंबईतील मराठीसह इतरही माध्यमांच्या शाळा आणि विद्यार्थी संख्या वाढावी, शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन साततत्याने विविध उपक्रम, योजना राबवित असते असंही पालिकेने म्हटले आहे.

कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण नाही

मुंबई महापालिकेने स्पष्ट केले की, पालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही. महानगरपालिका शाळांमध्ये विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी महानगरपालिका प्रशासन सातत्याने प्रयत्न करीत असते. एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये हेच आमचं ध्येय आहे. यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून पालकांचेही समुपदेशन करण्यात येत असते.

विद्यार्थ्यांनी मिळवले घवघवीत यश

गुणवत्ता वाढीसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे मार्च 2025 मध्ये झालेल्या दहावीच्या परीक्षेत महानगरपालिकेच्या मराठी शाळांचा 95 टक्के इतका निकाल लागला. महानगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीत 97 टक्के इतके गुण पटकावले आहेत. यासोबतच गुणवत्ता वाढ, सराव परीक्षा असे उपक्रम राबविण्यात येतात. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांकडून कोणत्याही स्वरूपाचे फी घेतली जात नाही. विद्यार्थ्यांना 27 प्रकारच्या शैक्षणिक वस्तूंचे मोफत वाटप केले जाते. महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांमध्ये शालेय गुणवत्तेसोबत क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळविण्यासाठी उपलब्ध जागेमध्ये क्रीडा प्रशिक्षण दिले जाते.

खान अकॅडमीच्या माध्यमातून गणित व विज्ञान विषयाचा अतिरिक्त सराव विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क उपलब्ध करुन दिले जाते. यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रगतीत उत्तम परिणाम दिसून येत आहे. महानगरपालिचा विद्यार्थी खासगी शाळेपेक्षाही अधिक गुणसंपन्न आणि त्याच्याकडे विविध शैक्षणिक सुविधा असाव्यात, यासाठी महानगरपालिका प्रयत्न करत असते. महानगरपालिकेने फाऊंडेशनल लिटरसी व न्यूमरसी (एफएलएन) निपूण भारत अंतर्गत महानगरपालिकेने केलेल्या प्रयत्नांमुळे तिसऱ्या इयत्तेतील प्रत्येक माध्यमाचा विद्यार्थी उत्तमप्रकारे वाचू शकतो. तसेच, त्या-त्या स्तरावरील गणिताचे ज्ञानही त्याला उत्तमरित्या अवगत होत आहे. यासाठी महानगरपालिकेने विशेष प्रयत्न केले असून याच चांगले परिणाम दिसून येत आहे.

शाळेबाबत प्रशासनाचे योग्य नियोजन

मुंबईतील मराठी शाळा आणि शिक्षण हा सामजिक आणि शैक्षणिक मुद्दा आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून कोणत्याही माध्यमांच्या शाळांचे खासगीकरण करण्यात आलेले नाही. बृहन्मुंबई महानगरपालिका मराठी शाळांबाबत चुकीचे धोरण राबवित असल्याचे जे आभासी चित्र निर्माण केले जात आहे, ते पूर्णपणे चुकीचे असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मराठी माध्यमांच्या सर्व शाळा प्रभावीपणे चालविण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन पूर्वीपासूनच गांभीर्याने नियोजन व कार्यवाही करीत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होऊ नये, किंबहुना ही संख्या वाढावी यासाठी महानगरपालिकेच्या वतीने मागील 10 ते 15 वर्षांपासून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. एवढेच नव्हे तर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये अभिनव उपक्रम देखील राबवले जातात अशी माहिती पालिकेने दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचा मुंबई पब्लिक स्कूल प्रकल्प

मुंबईच्या प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळावे, हीच बृहन्मुंबई महानगरपालिकेची (BMC) संकल्पना आहे. म्हणूनच बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्या शाळांना नवे रूप दिले ज्याचे नाव आहे मुंबई पब्लिक स्कूल (MPS) आहे. मुंबई पब्लिक स्कूल ही एक क्रांती आहे. BMC मुंबई पब्लिक स्कूल प्रकल्पांतर्गत, शहरातील अनेक शाळा आता CBSE, ICSE, IGCSE आणि IB सारख्या आंतरराष्ट्रीय बोर्डशी संलग्न आहेत. ज्यांतर्गत सद्यस्थीतीला

19 सीबीएसई

1 आयजीसीएसई

1 आयसीएसई

1 आयबी

मंडळाच्या शाळा कार्यरत आहेत.

पूर्वी एक भ्रम होता की, बीएमसी शाळांमधील शिक्षण म्हणजे द्रारिद्र्य रेषेखालच्या विद्यार्थ्यासाठीचे शिक्षण आहे. मात्र मुंबई पब्लिक स्कूल प्रकल्पांतर्गत एक गोष्ट आनंदाने सांगवीशी वाटते की, आता त्याच शाळांमध्ये एडमिशन मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभतो. काहिवेळेला अशी परिस्थिती उद्भवते की लॉटरी सिस्टम च्या माध्यमातून आपल्याला विद्यार्थ्यांची निवड करावी लागते. बऱ्याच हे प्रमाण एका जागेमागे 10 अर्ज इतक्या स्तरावर पोहोचते.

मुंबई पब्लिक स्कूल अंतर्गत मुलांना खालील विविध सुविधा मिळतात

  • पूर्णपणे मोफत शिक्षण – शाळा फी, पुस्तके, युनिफॉर्म, मिड-डे मील!
  • आधुनिक डिजिटल क्लासरूम, ऑडिओ-व्हिज्युअल एड्स
  • कुशल आणि प्रशिक्षित शिक्षक
  • लायब्ररी, लॅबोरेटरी, खेळाचे मैदान
  • अतिरिक्त उपक्रम – स्पोर्ट्स, आर्ट्स, स्कॉलरशिप योजना

विविध पालकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांचे म्हणणे आहे की, “आधी आम्ही खासगी शाळेसाठी खूप पैसे खर्च करायचो. आता MPS प्रकल्पामध्ये माझं मुलं मोफत शिकतंय आणि दर्जा खूप चांगला आहे!”

BMC ने जुनी शाळांची दुरुस्ती, नवीन इमारती बांधणे, आणि शिक्षकांचे प्रशिक्षण यावर भर दिला आहे. आज 1100+ शाळांमध्ये सुमारे 3 लाख विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. यात मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा 8 माध्यमांचा समावेश आहे.

हे प्रकल्प केवळ शिक्षण देत नाही, तर मुंबईच्या प्रत्येक मुलाला स्वप्न पाहण्याची, मोठं होण्याची संधी देत आहे. BMC मुंबई पब्लिक स्कूलमध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी भेट द्या: www.mcgm.gov.in किंवा www.mumbaipublicschools.in किंवा BMC च्या शिक्षण विभागाशी संपर्क साधा.

अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा
अजित पवार यांच्या स्मरणार्थ मुंबईत शोकसभा.
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून....
झेडपी निवडणुकांवर टांगती तलवार; 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून.....
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण
कांदा-मका दरघसरणीविरोधात चांदवडमध्ये शेतकऱ्यांचे आमरण उपोषण.
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका
पैश्यातून सत्ता आणि सत्तेतून पैसा ही एकमेव भाजपची भूमिका.
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा
सांगलीमध्ये शेतकऱ्यांचा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी भव्य मोर्चा.
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना....
माझा जवळचा मित्र गमावला; अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना.....
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले...
उद्धव ठाकरेंनी अजितदादांच्या निधनावर व्यक्त केला शोक, म्हणाले....
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
तर दादा त्यांना झापायचे; एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर...
अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठी शंका; आव्हाडांनी ब्लॅक बॉक्सवर....
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले
मला कुणी विचारलंच नाही, तर मी का बोलू! जितेंद्र आव्हाड स्पष्टच बोलले.