राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
राम मंदिर दान गैरव्यवहार प्रकरणावरून ठाकरे गट पुन्हा आक्रमक झाला आहे. या प्रकरणात याआधीही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने रामरक्षा आंदोलन केले होते. त्या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांकडून धार्मिक गीतांचे आणि रामरक्षेचे पठण करण्यात आले होते. या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती.

आता त्याच पार्श्वभूमीवर ठाण्यात पुन्हा आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. दुपारी 4 वाजता ठाण्यात हे आंदोलन होणार असल्याचे सांगितले जात आहे. या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी दादरमध्येही ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते. राम मंदिर दान प्रकरणातील कथित गैरव्यवहाराचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले होते. तसेच या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली होती.
दरम्यान, या प्रकरणात 8 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून तपास सुरू आहे. त्यामुळे ठाण्यातील आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Jul 11, 2026 11:01 AM
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका