AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली

ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS… राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली

| Updated on: Jul 11, 2026 | 10:13 AM
Share

शिवसेना ठाकरे गटातून 6 खासदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचाही समावेश होता. त्यांच्या निर्णयानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून टीका करण्यात आली होती.

उद्धव ठाकरे यांनी धाराशिवमधील सभेत ओमराजे निंबाळकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला होता. मात्र, त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी मतदारसंघात सक्रिय होत स्थानिक राजकारणात हालचाली वाढवल्या आहेत.

एका बाजूला त्यांनी भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याविरोधातील भूमिका कायम ठेवली आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजप नेत्यांशी संवाद सुरू केला आहे. त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शेषाद्री अण्णा डांगे यांची सदिच्छा भेट घेतली.

यादरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपला विरोध कोणत्याही पक्षाला नसून द्वेषाचे आणि नीच प्रवृत्तीच्या राजकारणाला असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे धाराशिवमधील राजकीय समीकरणांबाबत नव्या चर्चांना उधाण आले आहे.

Published on: Jul 11, 2026 10:13 AM

Follow Us