AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...

पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले…

| Updated on: Jul 11, 2026 | 10:18 AM
Share

मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत दुर्घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. बचावकार्य सुरू असताना प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

मोशी येथील वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातील इमारत दुर्घटनेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. राज्यात धो धो बरसणाऱ्या पावसादरम्यान इमारत कोसळली होती. बचावकार्य सुरू असताना प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या दुर्घटनेत आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत.

तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, दुर्घटनाग्रस्त तीन मजली प्रशासकीय इमारतीच्या केवळ तळमजल्यालाच अधिकृत परवानगी देण्यात आली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या बांधकाम विभागाने 27 जुलै 2023 रोजी तळमजल्यासाठी पूर्णत्वाचा दाखला दिला होता, असं सांगितलं जात आहे.

मात्र, पहिला आणि दुसरा मजला उभारण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेतल्याची नोंद उपलब्ध नसल्याचे शहर अभियंता मनोज सेठिया यांनी स्पष्ट केले आहे. तरीदेखील या मजल्यांवर कँटीन आणि कॉन्फरन्स रूम सुरू करण्यात आल्या होत्या.

विशेष म्हणजे, पर्यावरण विभागाने 26 जुलै रोजी सुधारित बांधकामाची परवानगी मागितली होती. त्यानंतर अवघ्या 24 तासांत पूर्णत्वाचा दाखला मंजूर करण्यात आला. यामुळे या अनधिकृत मजल्यांना परवानगी कोणी दिली, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. सखोल तपासानंतर याबाबतीत आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Published on: Jul 11, 2026 10:18 AM

Follow Us