एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री… कथित डॉनच्या घरावर छापा
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तथाकथित डॉनच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिटमिटा परिसरातील या बंगल्यावर अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तथाकथित डॉनच्या आलिशान बंगल्यावर गुन्हे शाखेने टाकलेल्या छाप्यामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिटमिटा परिसरातील या बंगल्यावर अत्यंत गोपनीय पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे 4 वाजता सुरू झालेली कारवाई तब्बल 21 तास चालली. मध्यरात्री 1 वाजेपर्यंत पोलीस पथकाने बंगल्याची सखोल तपासणी केली. या कारवाईत गुन्हे शाखा, आर्थिक गुन्हे शाखा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग होता.
तपासादरम्यान बंगल्यातील दोन खोल्यांमधून मोठ्या प्रमाणावर संशयास्पद रोकड आढळून आल्याची माहिती आहे. या रकमेमध्ये 500 रुपयांच्या नोटांचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. नोटा मोजण्यासाठी अनेक मशीन मागवण्यात आल्याचेही समोर आले आहे. याशिवाय सोन्या-चांदीचे दागिने आणि काही शस्त्रेही जप्त करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
‘बाबा’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कथित डॉनचा 1990 च्या दशकात शहरातील सिटी चौक आणि मिटमिटा परिसरात मोठा प्रभाव होता. काही महिन्यांपूर्वी त्यांचे निधन झाले होते.
Published on: Jul 11, 2026 11:46 AM
सुप्रीम कोर्टावर मोर्चा काढला हा इतिहासातील काळा दिवस; शिंदेंचा....
ना जास्त मतं, ना कमी, ईश्वरचिठ्ठीने ठरला विजय; यवतमाळमध्ये मविआच्या...
बॅरिकेटिंग, RAF तैनात अन् पोलिसांचा बंदोबस्त; जंतरमंतरवर आंदोलनाआधीच..
आंदोलनं दडपली तर...; संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा, म्हणाले...

