AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai High Court: मुलीचा विवाह होत नाही तोपर्यंत तिला सांभाळणं वडिलांची जबाबदारी, मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल

Mumbai High Court: मुलगी सज्ञान झाली तरी तिचा विवाह होईपर्यंत वडिलांना तिच्या पालनपोषणाची आणि शिक्षणाची जबाबदारी झटकता येणार नाही असा महत्त्वाचा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने एका याचिकेतील सुनावणीअंती दिला. काय आहे हे प्रकरण?

Mumbai High Court: मुलीचा विवाह होत नाही तोपर्यंत तिला सांभाळणं वडिलांची जबाबदारी, मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल
मुलीचा विवाह होत नाही तोपर्यंत तिला सांभाळणं वडिलांची जबाबदारी, मुंबई हायकोर्टाचा मोठा निकाल
| Updated on: Oct 17, 2026 | 10:26 AM
Share

Mumbai High Court: मुलगी सज्ञान (१८ वर्षांची) झाली तरी विवाह होईपर्यंत वडिलांना तिच्या पालनपोषणाची आणि शिक्षणाची जबाबदारी झटकता येणार नाही. असा अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. सज्ञान अविवाहित मुलीलाही वडिलांकडून पोटगीचा अधिकार असल्याचे या मोठ्या निकालातून न्यायालयाने अधोरेखित केले आहे. विवाह होईपर्यंत शिक्षण आणि पालनपोषणाचा खर्च देणे बंधनकारक असल्याचे हिंदू दत्तक व भरणपोषण कायद्याचा महत्त्वाचा हवाला या खटल्यात देण्यात आला.

हायकोर्टाचे महत्त्वाचे निरीक्षण

अविवाहित सज्ञान मुलगी स्वत:चा उदरनिर्वाह करण्यास सक्षम नसेल, तर तिला वडिलांकडून कायदेशीररीत्या पोटगी मिळवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, कायद्यानुसार सज्ञान मुलगा स्वत: कमवू लागल्यानंतर पालकांची आर्थिक जबाबदारी संपू शकते. मात्र अविवाहित मुलीच्या बाबतीत नियम वेगळे आहेत.

हिंदू दत्तक आणि भरणपोषण कायदा, १९५६ च्या कलम २० (३) चा संदर्भ देत न्यायालयाने नमूद केले की, जोपर्यंत मुलीचा विवाह होत नाही आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाही, तोपर्यंत तिचा सांभाळ करणे आणि शिक्षणाचा खर्च देणे हे वडिलांचे कायदेशीर कर्तव्य आहे. मुलगी सज्ञान झाली या एकमेव कारणावरून वडील पोटगी देण्यास नकार देऊ शकत नाहीत.

लेक 18 वर्षांची झाली म्हणून कर्तव्य संपत नाही

कायद्यानुसार, सज्ञान मुलगा स्वतः कमवू लागल्यानंतर पालकांची आर्थिक जबाबदारी संपू शकते. मात्र अविवाहित मुलीच्या बाबतीत नियम वेगळे आहेत. हिंदू दत्तक आणि भरणपोषण कायदा, 1956, कलम 20(3) चा संदर्भ देत न्यायालयाने नमूद केले की, जोपर्यंत मुलीचा विवाह होत नाही आणि ती स्वतःच्या पायावर उभी राहत नाही. तोपर्यंत तिचा सांभाळ करणे आणि शिक्षणाचा खर्च देणे हे वडिलांचे कायदेशीर कर्तव्य आहे. मुलगी सज्ञान झाल्याचा हवाला देत वडील पोटगी देण्यास नकार देऊ शकत नाही, असे न्यायालयाने निकालात स्पष्ट केले.

पालक घटस्फोट प्रकरणात मोठा दिलासा

आई-वडिलांचा घटस्फोट झाल्यानंतर अनेकदा वडील मुलीचा खर्च देण्यास नकार देतात. मुलगी 18 वर्षांची झाल्यावर तिचा देखभाल खर्च वडील देत नाहीत. अशा प्रकरणात हा निकाल मुलींसाठी दिलासादायक मानला जात आहे. उच्च शिक्षण घेणाऱ्या आणि स्वतःचे उत्पन्न साधन नसणाऱ्या मुलींना केवळ सज्ञान झाली म्हणून निराधार सोडता येणार नाही असे या निकालाने अधोरेखित झाले आहे.

Follow Us
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी...
अखेर व्हिडीओ समोर आलाच! पुण्यात भाजपसोबतच्या बैठकीत राष्ट्रवादी नेत्याकडून तीव्र खदखद व्यक्त
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?