2014 नंतरच्या इमारतींना अग्निसुरक्षा शुल्क, BMC ने आवळा देऊन कोहळा काढला, विरोधकांचं टीकास्त्र

| Updated on: Jun 30, 2021 | 10:05 AM

लॉकडाऊन आणि कोरोना संकटात आता मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मुंबई महापालिका () 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारणार आहे.

2014 नंतरच्या इमारतींना अग्निसुरक्षा शुल्क, BMC ने आवळा देऊन कोहळा काढला, विरोधकांचं टीकास्त्र
mumbai municiple corporation
Follow us on

मुंबई : लॉकडाऊन आणि कोरोना संकटात आता मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार आहे. कारण मुंबई महापालिका (Mumbai Municipal corporation) 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून अग्निसुरक्षा शुल्क आकारणार आहे. एकीकडे कोरोना संकटाचं कारण देत महापालिकेने मालमत्ता कर आणि पाणीपट्टी करवाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र दुसरीकडे अग्निसुरक्षेचं कारण देत, सरसकट इमारतींना शुल्क लावलं जाणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने (BMC) आवळा देऊन, कोहळा काढला अशी प्रतिक्रिया आता विरोधक देत आहेत. (Brihanmumbai Municipal Corporation BMC to charge fire safety for all buildings after built 2014 )

दरम्यान, 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून 10 ते 15 रुपये प्रति चौरस मीटर दराप्रमाणे अग्निसुरक्षा शुल्क आकारलं जाणार आहे. कोरोना संकटाचा हवाला देत मालमत्ता कर,पाणी पट्टीतील वाढ याला मुंबई महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधी पक्षाने विरोध केला. त्यामुळे करवाढीचा बोजा मुंबईकरांवर पडला नाही. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला असतानाच आता अग्निसुरक्षा शुल्क आकारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

ताबा प्रमाणपत्र देताना विकासकाकडून हे शुल्क एकदाच घेतले जाणार. मात्र याला भाजप आणि काँग्रेसने विरोध केला आहे. सत्ताधाऱ्यांचा प्रशासनावर वचक नाही का असा सवाल मुंबई महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी विचारला आहे.

पूर्वलक्षी प्रभावाने अग्निसुरक्षा शुल्क

महत्त्वाचं म्हणजे 3 मार्च 2014 नंतरच्या सर्व इमारतींकडून पूर्वलक्षी प्रभावाने अग्निसुरक्षा शुल्क वसूल केलं जाणार आहे. रहिवासी क्षेत्रफळ, रहिवासी इमारती, हॉटेल, व्यावसायिक आस्थापने, एकूण क्षेत्रफळ यानुसार हे शुल्क घेतलं जाणार आहे.

मालमत्ता करातील प्रस्तावित दरवाढ रद्द

गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांच्या डोक्यावर मालमत्ता करवाढीची असलेली टांगती तलवार अखेर दूर झाली आहे. मालमत्ता करात (Property Tax) 14 टक्के दरवाढ प्रस्तावित होती. मात्र, ही दरवाढ गेल्या आठवड्यात अखेर रद्द करण्यात आली. स्थायी समितीच्या बैठकीत मालमत्ता कराच्या दरवाढीचा प्रस्ताव मांडण्यात आल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी तो फेटाळून लावला.

संबंधित बातम्या 

मुंबईकरांची चिंता मिटली; मालमत्ता करातील 14 टक्के दरवाढ रद्द

मुंबईकरांवर कराचा बोजा लादलात तर काँग्रेस पक्ष आडवा येईल; भाई जगतापांचा शिवसेनेला इशारा

मुंबईकरांवर आधीच आर्थिक संकट, त्यात मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही : महापौर किशोरी पेडणेकर