मुंबईकरांवर आधीच आर्थिक संकट, त्यात मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही : महापौर किशोरी पेडणेकर

पण तोपर्यंत मुंबईकरांवर मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही,' असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (There will be no hike in Property tax in Mumbai Mayor Kishori Pednekar)

मुंबईकरांवर आधीच आर्थिक संकट, त्यात मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही : महापौर किशोरी पेडणेकर
mayor kishori pednekar

मुंबई : कोरोना काळात सर्वांचीच आर्थिक स्थिती ढासळली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईची स्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढ लादणार नाही, असे स्पष्टीकरण महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. कोरोनामुळे लाखो, कोट्यवधी लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. व्यवसाय, रोजगार बंद पडले आहेत. “मुंबईकर आर्थिक संकटात सापडले आहेत. हे सर्व सुस्थितीत येण्यास किती काळ लागेल याची काही माहिती नाही. पण तोपर्यंत मुंबईकरांवर मालमत्ता कर दरवाढीचा बोजा टाकणार नाही,’ असे महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. (There will be no hike in Property tax in Mumbai till COVID situation said Mayor Kishori Pednekar)

मालमत्ता करवाढीला विरोधकांचा कडाडून विरोध

मुंबई महापालिकेने येत्या आर्थिक वर्षीपासून मालमत्ता करात 14 टक्के ते 25 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत अंदाजे एक हजार कोटींची वाढ होणार आहे. या मालमत्ता कर वाढीला विरोधी पक्षाने कडाडून विरोध दर्शवला होता. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांनी मालमत्ता करवाढीबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढीचा बोजा नाही

मुंबईकर गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना संकटाशी लढत आहेत. त्यामुळे जोपर्यंत मुंबईची स्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत मुंबईकरांवर मालमत्ता कर वाढीचा बोजा टाकणार नाही. या निर्णयानंतर काही जण म्हणतील की आम्ही निवडणूक आल्याने असं बोलत आहोत. पण ते चुकीचं आहे. विरोधकांना बोलत राहू द्या. आम्हाला लोक महत्त्वाचे आहेत, असेही महापौर म्हणाल्या.

वेळ पडली तर पुन्हा कोव्हिड सेंटर सुरु करु

मुंबईत सध्या कोरोनाचे संकट कमी होत आहे. त्यामुळे काही कोव्हिड सेंटर बंद ठेवण्यात आली आहे. मात्र ही सेंटर कायमस्वरुपी बंद ठेवली जाणार नाही. जर वेळ पडली तर ती पुन्हा सुरु करु, असेही महापौर म्हणाल्या.

(There will be no hike in Property tax in Mumbai till COVID situation said Mayor Kishori Pednekar)

संबंधित बातम्या : 

मोठी बातमी: पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत ‘या’ भागात रडार बसवणार

मुंबईत पावसाचा कहर, मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू, पुढील काही तास धोक्याचे

सावधान! म्युकरमायकोसिस शरीरात पसरला, मुंबईत तीन लहान मुलांचे डोळे काढावे लागले