मोठी बातमी: पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत ‘या’ भागात रडार बसवणार

Weather Alert | हवामान खात्याकडून रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकातील मंगळुरू या परिसरात नव्या रडार यंत्रणा लावण्यात येतील. या रडार यंत्रणा 100 किलोमीटरच्या परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तवतील.

मोठी बातमी: पावसाच्या अचूक अंदाजासाठी मुंबईत 'या' भागात रडार बसवणार
या रडार यंत्रणा 100 किलोमीटरच्या परिसरातील हवामानाचा वेध घेतील
Follow us
| Updated on: Jun 18, 2021 | 1:08 PM

मुंबई: हवामानाचे अंदाज आणखी अचूकरित्या वर्तवण्यासाठी राज्यातील चार ठिकाणी रडार यंत्रणा लावण्यात येणार आहे. यापैकी एक रडार मुंबईच्या बोरिवली परिसरात बसवण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात मुंबईत पावसाचा (Rain) अंदाज अधिक अचूकरित्या वर्तवला जाईल. हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्रा यांनी शुक्रवारी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार मुंबई आणि कोकण परिसरात चार रडार यंत्रणा बसवण्यात येणार आहेत. आयआयटीएम या संस्थेतर्फे ही रडार बसवली जातील. (Radar system for weather prediction in Mumbai and Pune Region)

तर हवामान खात्याकडून रत्नागिरी, बोरिवली तसेच कर्नाटकातील मंगळुरू या परिसरात नव्या रडार यंत्रणा लावण्यात येतील. या रडार यंत्रणा 100 किलोमीटरच्या परिसरातील हवामानाचा अंदाज वर्तवतील. याशिवाय, मराठवाडा आणि पश्चिम किनारपट्टीवर रडार यंत्रणा मजबूत करण्याचा हवामान विभागाचा प्रयत्न असल्याची माहिती मृत्यूंजय महापात्रा यांनी दिली.

पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस

राज्यात पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. येत्या काही तासात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गासह कोकण किनारपट्टी भागात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याशिवाय पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर याठिकाणीही रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाचे ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवस राज्यात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह सोसायट्याचा वारा वाहण्याचा अंदाज आहे.

सातारा, पुणे आणि रत्नागिरीला रेड अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. तर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग , रायगड आणि पालघरला ऑरेंज अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे. औरंगाबाद, नागपूर, अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशिम, जालना, बीड, उस्मानाबाद आणि लातूरला पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

संंबंधित बातम्या:

Weather Alert | मुंबईत मुसळधार, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ऑरेंज अलर्ट, पुढील पाच दिवस राज्यात कुठे-कुठे पाऊस?

मुंबईत पावसाचा कहर, मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू, पुढील काही तास धोक्याचे

Panchaganga River | कोल्हापुरात मुसळधार पाऊस, पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर

(Radar system for weather prediction in Mumbai and Pune Region)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.