AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो रविवारी लोकलचा प्रवास करताना सावधान, या मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर

मध्य रेल्वेने रविवारी महत्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. यामुळे लोकल गाड्यांची वाहतूक काही सेक्शनमध्ये बंद रहाणार आहे. प्रवाशांनी रविवारी घराबाहेर पडताना वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईकरांनो रविवारी लोकलचा प्रवास करताना सावधान, या मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर
sunday mega block
| Updated on: Apr 03, 2026 | 4:42 PM
Share

मध्य रेल्वेने रविवार दि. ०५ एप्रिल २०२६ रोजी मेगा ब्लॉक मध्य रेल्वेच्या हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. त्यामुळे रविवारी घरातून बाहेर पडताना मुंबईकरांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात येत आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनमध्ये विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांच्या अंमलबजावणीसाठी रविवारी दि.५ एप्रिल रोजी उपनगरीय मार्गावर मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक

पनवेल आणि वाशी स्थानकांदरम्यान सकाळी ११.०५ वा. ते सायंकाळी ४.०५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन हार्बर मार्ग (पोर्ट मार्ग वगळून)

हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या

पनवेल येथून सकाळी १०:३३ वाजता ते दुपारी ३:४९ वाजता या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने सुटणाऱ्या ‘अप’ हार्बर मार्ग लोकल फेऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९:४५ वाजता ते दुपारी ३:१२ वाजता या वेळेत पनवेल-बेलापूरच्या दिशेने सुटणाऱ्या ‘डाऊन’ हार्बर मार्ग लोकव फेऱ्यांना रद्द करण्यात आले आहे.

ट्रान्स-हार्बर मार्ग फेऱ्या

पनवेलहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या ‘अप’ ट्रान्स-हार्बर मार्ग लोकल फेऱ्या सकाळी ११:०२ वाजता ते दुपारी ३:५३ वाजेपर्यंत ठाणे येथून पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या ‘डाऊन’ ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या सकाळी १०:०१ वाजता ते दुपारी ३:२० वाजेपर्यंत रद्द राहणार आहेत.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – वाशी विभागावर विशेष उपनगरीय गाड्या चालवण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत ट्रान्स-हार्बर मार्गावरील ठाणे-वाशी-नेरुळ स्थानकांदरम्यान लोकल फेऱ्या उपलब्ध असतील.

ब्लॉक कालावधीत बेलापूर – नेरुळ आणि उरण स्थानकांदरम्यान पोर्ट मार्गावरील सेवा उपलब्ध असतील.

पायाभूत सुविधांची देखभाल करण्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी हे ‘मेगा ब्लॉक’ अत्यंत आवश्यक आहेत. यामुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल मध्य रेल्वे प्रशासन दिलगीर आहे असे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल