AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तो सिनेमा पाहायला गेले नि पोलिसांनी पकडले…बावनकुळेंची प्यार वाली Love Story, स्वत:चा सांगितला तो किस्सा

Chandrashekhar Bawankule Love Story: दूध विकले, ऑटो चालवला आणि संसाराचा गाडा हाकला. घराच्यांचा विरोध असतानाही लग्न केले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या प्रेमकथेचा खुमासदार किस्सा सांगितला. त्यांची लव्हस्टोरी आणि तो किस्सा ऐकून सांगलीतील सभागृहात एकच हशा पिकला.

तो सिनेमा पाहायला गेले नि पोलिसांनी पकडले...बावनकुळेंची प्यार वाली Love Story, स्वत:चा सांगितला तो किस्सा
चंद्रशेखर बावनकुळेImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 18, 2026 | 1:02 PM
Share

Chandrashekhar Bawankule Love Story: सोशल मीडियावर इन्फ्ल्यिनुसर कडून होणाऱ्या टिकेवरून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुलगी पळून नेल्याचा खुमासदार किस्सा सांगितला. सांगलीच्या मिरजेमध्ये डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनात ते बोलत होते. यावेळी त्यांनी त्यांची प्रेमकथा समोर आणली. त्यांनी प्रेमासाठी वाट्टेल ते करण्याची तयारी दाखवली. घरच्यांचा विरोध असतानाही प्रेमासाठी खस्ता खाल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी त्या काळाला उजळला देत प्रेमासाठी तुरुंगवारी केल्याचेही सांगितले.

सिनेमा पाहिला आणि पोलिसांनी पकडले

नागपूरमध्ये कयामत से कयामत तक पिक्चर बघण्यासाठी होणार्‍या बायकोला घेऊन गेलो. त्यानंतर अल्पवयीन म्हणून पोलिसांनी पकडले. अल्पवयीन मुलगी पळवून नेल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यामुळे 7 दिवस तुरूंगात राहावं लागलं असा किस्सा मंत्रिमहोदयांनी सांगितले. पुढे जाऊन लग्न झालं, माझ्या मुलगी पळून नेल्याची टीका करणाऱ्या त्या इन्फ्ल्यूंसरला ती माझीच बायको होती,हे माहित नाही,अशी मिश्किल टिप्पणी केली, मंत्री बावनकुळे याची लव्हस्टोरी ऐकून सभागृहात एकच हशा पिकला.

प्रेमासाठी वाट्टेल ते

घरीची परिस्थिती चांगली होती. बावनकुळे हे तेली समाजाचे तर त्यांची पत्नी ही कुणबी समाजाची, त्यांच्या या प्रेम विवाहाला घरच्या मंडळींनी विरोध केला. घरी 200 एकर जमीन आणि मोठा कुटुंब कबिला होता. पण घरच्यांना हे लग्न मान्य नव्हते. ते 10 बाय 10 च्या खोलीत राहिले. प्रसंगी त्यांनी दूध विकले. ऑटो चालवला. परिस्थितीच तशी होती की संसारसाठी ही कामं करावी लागली असे बावनकुळे यांनी सांगितले. तो काळ वाईट गेला. परिस्थितीनुसार काम करावे लागले. पण पुढे घरच्यांचा विरोध मावळला. त्यांनी दोघांनाही स्वीकारले. बावनकुळे यांनी त्यांची प्रेमकथा या कार्यक्रमात सांगितली.

घराबाहेर काढले

ज्योती बावनकुळे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे कयामत से कयामत तक सिनेमा पाहायला गेले. पण तिथे पोलिसांनी दोघांना पकडले. अल्पवयीन मुलीला पळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल होऊन तुरुंगाची हवा खावी लागली. दोघांच्याही घरचे नाराज होते. बावनकुळेंच्या घराच्यांनी त्यांना थेट बाहेरचा रस्ता दाखवला. तेव्हा प्रेमासाठी आणि कुटुंबासाठी पडेल ते काम केल्याची आठवण बावनकुळे यांनी जागवली.

Follow Us
चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित
Mumbai FDA : चेंबूरमधील गुड लक आणि अशफाक बेकरीचा FSSAI परवाना निलंबित; स्वच्छता निकषांचे उल्लंघन
सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28...
Shivsena Hearing : सुप्रीम कोर्टात शिंदेंच्या शिवसेनेच्या युक्तिवादाचे 29 मुद्दे, 28 वा मुद्दा सर्वात खास
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि...
जरांगे नावाची सिरीज, प्रोड्युसर शिंदे, हिरो मनोज जरांगे आणि... गुणरत्न सदावर्तेंची पत्रकार परिषद ऐकाच!
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर...
माझ्या भावाच्या अपघातावर एफआयआर नाही मात्र अमित ठाकरेंवर... सत्ताधारी पक्षाच्या भूमिकेवर सुळे संतापल्या
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार
मराठा आरक्षणाचं प्रकरण निर्णायक वळणावर? प्रसाद लाड जरांगेंची भेट घेणार अन्...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा...
हातावर बड्या नेत्याचं नाव लिहून जीवन संपवणाऱ्या डॉक्टर प्रकरणी मोठा खुलासा; कुटुंबाकडून हादरवणारी माहिती समोर
महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
बुलढाण्यात राजकीय वाद विकोपाला; महालेंनी गायकवाडांच्या मतदारसंघात जाऊन अजब पद्धतीने साजरा केला वाढदिवस
जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच...
चालता येईना... जरांगे पाटीलांंची उपोषणाच्या पाचव्या दिवशी तब्येत खालावली; व्हिडीओच आला समोर
कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
बाळासाहेब म्हणाले होते, माझ्या पक्षाची काँग्रेस... कोर्टातील युक्तिवादाबाबत एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया, काय म्हणाले?
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला
केडीएमसीमध्ये भाजप-मनसे वाद चिघळला: अमित ठाकरेंच्या निषेधार्थ सभा तहकूब