AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Taxi new Fare Chart 2022 | तुम्हाला टॅक्सी चालकाने दाखवलेला भाडे तक्ता बरोबर आहे का तपासा, तुमची लूट होणार नाही

मुंबई आणि परीसरात एक ऑक्टोबरपासून रिक्षा आणि टॅक्सीची भाडेवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र या नव्या भाडेवाढीनूसार अजूनपर्यंत काळी-पिवळी टॅक्सीच्या मीटरमध्ये बदल केलेले नाहीत. त्यासाठी टॅक्सी चालकांना येत्या 15 जानेवारीपर्यंत परवानगी दिली आहे. त्यामुळे तोपर्यत चालकांकडील भाडे तक्ता पाहून भाडे भरावे लागत आहे. यात काही चालक जुने चार्ट वापरत आहेत, किंवा बनावट चार्ट वापरत आहेत, तेव्हा हे चार्ट नीट पाहा..

Taxi new Fare Chart 2022 | तुम्हाला टॅक्सी चालकाने दाखवलेला भाडे तक्ता बरोबर आहे का तपासा, तुमची लूट होणार नाही
taxi-fare (1)Image Credit source: taxi-fare (1)
| Updated on: Dec 17, 2022 | 6:51 PM
Share

मुंबई : सीएनजीचे ( CNG ) दर वाढल्याने टॅक्सी (Taxi ) आणि रिक्षा चालकांनी परिवहन विभागाकडे ( Transport Department ) भाडेवाढीची ( Fare ) मागणी केली होती, त्यानुसार राज्यातील रिक्षा आणि टॅक्सीची भाढेवाढ ( Fare Hike ) करण्यात आली, इलेक्ट्रॉनिक्स मीटर असल्याने अंतरानुसार मीटरमध्ये योग्य ती सेटिंग्ज करण्यासाठी (RE-CALIBERATION – रिकॅलिबरेशन ) वेळ जात आहे, त्यासाठी आरटीओच्या मॅकेनिककडे रांगा लागल्या आहेत, येत्या 15 जानेवारीपर्यंत हे मीटर कॅलीबरेशनचे काम चालणार आहे.  या दरम्यान ग्राहकांची गैरसोय होऊ नये यासाठी वाढीव भाड्याचा चार्ट टॅक्सी चालकांना लॅमिनेशन करुन दिला आहे. काळी- पिवळीचे टॅक्सी चालक त्यानूसार ग्राहकांकडून त्यानुसार भाडे घेत आहेत. परंतू  सर्वच क्षेत्रात चांगले वाईट लोक असतात, तसेच या क्षेत्रातही आहेतच. काहींनी ग्राहकांकडून जास्त पैसे कसे वसूल करता येतील यासाठी बनावट चार्ट बनवल्याचं सांगण्यात येतं. परिवहन विभागाने नवीन भाडेवाढीचे चार्ट जारी केले आहेत, पण उभेउभ रंगसंगतीचे पण भाड्याचे आकडे जास्त असणारे बनावट चार्ट काही रिक्षा आणि टॅक्सी चालकांकडे आहेत.

New Taxi Fare Chart 2022

मुंबईसह मोठ्या शहरांमध्ये टॅक्सी, रिक्षा हा लोकांसाठी महत्त्वाचा भाग आहे. अशा घाईगर्दीत बनावट चार्ट दाखवून तुमच्याकडून पैसे वसूल केले जात असतील तर वेळेतच सावध व्हा आणि बातमीसोबत देत असलेला हा चार्ट नक्की पाहा.

इलेक्टॉनिक्स मीटरमध्येही काही टॅक्सी चालकांनी घोळ केला आहे, हे असे मीटर सेट करणारे मॅकेनीक मुंबईत असल्याचं नाव न छापण्याच्या अटीवर अनेक टॅक्सी चालक मान्य करतात. अशा प्रकारे मीटर फास्ट पळण्यासाठी होत असलेल्या सेटिंग्जमुळे टॅक्सी चालकांवर असलेला लोकांचा विश्वास कमी होतो आहे,  त्यामुळे भाढेवाढीची मागणी करण्यासाठी टॅक्सी चालक संघटना जशा पुढाकार घेतात, त्याप्रमाणे त्यांनी टॅक्सी चालकांवरील लोकांचा विश्वास कमी होवू नये, म्हणून या टॅक्सी संघटनांनी चुकीचे मीटर सेटिंग्ज करु नका, म्हणून टॅक्सी चालकांना समज देणे गरजेचे आहे.

New Taxi Fare Chart 2022

fareTaxi-2

अजूनही 15 जानेवारीपर्यंत मीटर कॅलिबरेशनचे काम चालणार आहे, त्यामुळे बातमीसोबत असलेले चार्ट पाहूनच तुम्ही प्रवासाचं भाडं द्यावं लागणार आहे. जेवढं जास्त लांब अंतर तेवढी मीटर सेटिंग्जमुळे तुमची जास्त लूट होवू शकते. तेव्हा हा चार्ट नीट लक्षात ठेवा…

New Taxi Fare Chart 2022

fareTaxi-3

New Taxi Fare Chart 2022

बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?
मुंबईत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला अखेर ठरला; कोण किती जागा लढवणार?.
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ
नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीची निर्घृण हत्या, खोपीलीमध्ये एकच खळबळ.
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?
काँग्रेस प्रवेशापूर्वी ठाकरेंचा प्रशांत जगतापांना फोन, काय झाली चर्चा?.