वर्षा बंगल्यावर आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंना कोरोना, आता आणखी एका कर्मचाऱ्याला लागण

| Updated on: Apr 03, 2021 | 11:34 AM

मुख्यमंत्री कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धोका आणखी वाढला आहे. (Uddhav Thackeray Varsha Bunglow Staff Corona)

वर्षा बंगल्यावर आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरेंना कोरोना, आता आणखी एका कर्मचाऱ्याला लागण
CM Uddhav Thackeray
Follow us on

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या चिंतेत अजून वाढ झाली आहे. (CM Uddhav Thackeray Varsha Bunglow Staff Tested Corona Positive)

मुख्यमंत्री कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला लागण

गेल्या काही दिवसांपासून वर्षा बंगल्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. वर्षा बंगल्यावर एकामागोमाग एकाला कोरोनाची लागण होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. नुकतंच मुख्यमंत्री कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे धोका आणखी वाढला आहे.

तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य ठाकरे हे दोघेही कोरोनाबाधित आहेत. सद्यस्थितीत रश्मी ठाकरे एच एन रुग्णालयात दाखल आहेत. तर आदित्य ठाकरे दुसरी चाचणी निगेटिव्ह येण्याची वाट बघत आहे (CM Uddhav Thackeray Varsha Bunglow Staff Tested Corona Positive)

रश्मी ठाकरेंना कोरोना 

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना (Rashmi Thackeray) कोरोनाची बाधा झाली होती. त्यांनतर त्या मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानीच क्वारंटाईन झाल्या होत्या. यानंतर काही दिवसांपूर्वी त्यांना एच एन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रश्मी ठाकरे सध्या डॉक्टरांच्या निगराणीखाली असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्यांनी जे जे रुग्णालयात कोरोनाची लस टोचून घेतली होती.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेही कोरोना पॉझिटिव्ह

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनीही ट्विट करत कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची माहिती दिली होती. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी काळजी घ्यावी आणि चाचणी करून घ्यावी. माझी सर्वांना विनंती आहे की कायम मास्क घाला आणि आपली व आपल्या परिवाराची काळजी घ्या”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. दरम्यान सध्या आदित्य ठाकरे यांची प्रकृती स्थिर असून ते कोरोनाची दुसरी टेस्ट नेगिटिव्ह येण्याची वाट पाहत आहेत.

संबंधित बातम्या : 

पत्नी रुग्णालयात, मुलाचा कोरोनाशी लढा, तरीही धीरोदात्तपणे हा माणूस महाराष्ट्र सांभाळतोय, आव्हाडांचा मुख्यमंत्र्यांना सलाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह