AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीचे पहिले मोठे पाऊल, या तिघांची प्रवक्ते पदी अधिकृत घोषणा, कुणाला मिळाली संधी?

Cockroach Janta Party Spokespersons: कॉकरोच जनता पार्टी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 6 जून रोजी या पार्टीने आंदोलनाची हाक दिली आहे. तर त्यापूर्वी पक्षाने तीन जणांची पक्षाचे प्रवक्ते म्हणून नियुक्ती केली आहे. कुणाला मिळाली ही संधी? कोण आहेत ते प्रवक्ते?

Cockroach Janta Party: कॉकरोच जनता पार्टीचे पहिले मोठे पाऊल, या तिघांची प्रवक्ते पदी अधिकृत घोषणा, कुणाला मिळाली संधी?
अभिजीत दीपके, कॉकरोच जनता पार्टीImage Credit source: एजन्सी
| Updated on: Jun 03, 2026 | 1:30 PM
Share

Cockroach Janta Party Spokespersons: गेल्या महिन्यापासून देशात कॉकरोच जनता पार्टीची एकच चर्चा सुरू आहे. या डिजिटल चळवळीने देशातील तरुणाईचे लक्ष वेधले आहे. बेरोजगारी आणि नीट प्रश्नपत्रिका फुटीविरोधात या पक्षाने एल्गार पुकारला आहे. तर तीन दिवसांनी दिल्लीत मोठ्या आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनाला आता प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्यासह इतर अनेकांनी या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. तर घडामोडींपूर्वी कॉकरोच जनता पार्टीने तीन प्रवक्त्यांची नावं जाहीर केली आहे. एक्स हँडलवर अभिजीत दीपके यांनी याविषयीची पोस्ट केली आहे. तर पक्षाच्या एक्स हँडलवरही ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते कोण?

कॉकरोच जनता पार्टीने तीन प्रवक्त्यांची नावं जाहीर केली आहेत. अधिकृत एक्स हँडलवर पक्षाने या तिघांची नावं जाहीर केली आहे. त्यांच्याविषयी माहिती दिली आहे. कॉकरोच जनता पार्टीने एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यानुसार, ज्या तीन प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ते जनता आणि मीडिया समोर आंदोलनाशी संबंधित सर्व माहिती देतील.

CJP ने शोध पत्रकार सौरव दास यांना मुख्य प्रवक्ते केले आहे. तर लेखक आणि निर्माता विजेता दहिया आणि IIT Kanpur चे माजी विद्यार्थी आशुतोष रांका यांना प्रवक्ते पदाची जबाबदारी सोपवली आहे. सीजीपी भारताची राजकीय भाषा आणि विचार बदलण्याचे काम करत आहे. नवीन पिढीतील नेत्यांच्या नेतृत्वात हे काम करण्यात येईल असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

6 जून रोजी दिल्लीत आंदोलनाची हाक

कॉकरोच जनात पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके हे 6 जून रोजी भारतात परतत आहेत. त्यांनी दिल्लीत आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली आहे. त्यासाठी जंतरमंतरवर प्रदर्शन करण्यात येणार आहे.

या अगोदर राष्ट्रीय सुरक्षेचे कारण देत कॉकरोच जनता पार्टीचे एक्स खाते बंद करण्यात आले होते. सुरक्षा यंत्रणांनी व्हायरल मॅसेजमुळे चिंता व्यक्त केली होती. सुरुवातीच्या अगदी काही तासातच या पक्षाला मोठे फॉलोअर्स मिळाले. तर काही दिवसात या पक्षाने फॉलोअर्सचे विक्रम नोंदवले. भाजप आणि काँग्रेसच्या सोशल मीडिया खात्यालाही फॉलोअर्समध्ये या पक्षाने मागे टाकले होते. पण पक्षाचे एक्स खाते सस्पेंड करण्यात आले. तर इन्स्टाग्राम खातेही हॅक करण्यात आले. त्यानंतर सीजेपीने एक्सवर नवीन खाते सुरू केले.

Follow Us
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
Kolhapur : ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं कृत्य उघड, चुलत्यालाच दिला मोठा धक्का
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
Jio Platforms IPO : ऐतिहासिक विक्रम! जिओ प्लॅटफोर्मच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
Manoj Jarange Patil : शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; मनोज जरांगे पाटील रामदास कदमांवर भडकले, नेमकं काय म्हणाले?
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
Prasad Kadam : रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाडांचं सडेतोड उत्तर
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
Ramdas Kadam : समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगे पाटलांवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल
अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट..
CM Devendra Fadnavis : अग्निवीरांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; 282 नौदल अग्निवीरांना थेट...
बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी..
Pune : बारामतीत पैसे वाटपाचा व्हिडिओ व्हायरल; अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती असल्याचा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं...
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या जलसा बंगल्याला बॉम्बने उडवण्याची धमकी; नेमकं प्रकरण काय?
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं...
Chhagan Bhujbal : 500 कोटींच्या कथित ऑडिओ क्लिपवर भुजबळांचा मोठा प्रश्न; 50-15 कोटी म्हटलं असतं, तर…
मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो - राज ठाकरे
Raj Thackeray : मराठवाड्याचं वाळवंट होईल, हे आधीपासून सांगत होतो; राज ठाकरेंचा दुष्काळावरून इशारा