विधान परिषदेच्या निवडणुकीत ‘फोडाफोडी’, काँग्रेसचे 4 आमदार फुटणार? आमदार कैलास गोरंट्याल यांचा गौप्यस्फोट

विधान परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाला क्रॉस व्होटिंगची भीती आहे. त्यामुळे राज्यातील 4 मोठ्या पक्षांनी आपापल्या पक्षाच्या आमदारांना मुंबईतील वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवलं आहे. विधान परिषदेच्या 11 जागांच्या निवडणुकीत 12 उमेदवार असल्याने चुरस वाढली आहे. असं असताना काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी क्रॉस व्होटिंगबद्दल मोठा गौप्यस्फोट केला आहे.

विधान परिषदेच्या निवडणुकीत 'फोडाफोडी', काँग्रेसचे 4 आमदार फुटणार? आमदार कैलास गोरंट्याल यांचा गौप्यस्फोट
विधान परिषद निवडणूक
Follow us
| Updated on: Jul 11, 2024 | 6:57 PM

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी उद्या मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सध्या हॉटेल पॉलिटिक्स बघायला मिळत आहे. राज्यातील 4 मोठ्या पक्षांनी आपापल्या पक्षाचे आमदार मुंबईतील फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. या सर्व आमदारांची मुक्काची व्यवस्था सध्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आहे. कोणत्याही प्रकारचा दगाफटका होऊ नये यासाठी ही काळजी घेतली जात आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि शिवसेना ठाकरे गट या 4 पक्षांनी आपले आमदार वेगवेगळ्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवले आहेत. फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने आपल्या आमदारांना कोणत्याही हॉटेलमध्ये एकत्र ठेवलेलं नाही. त्यामुळे या दोन्ही पक्षांना आपले आमदार क्रॉस व्होटींग करणार नाहीत, याची खात्री असेल, अशी चर्चा होती. पण काँग्रेस आमदार कैलास गोरंट्याल यांनी आपल्या पक्षाचे 4 मते फुटण्याची शक्यता असल्याचा खळबळजनक दावा केला आहे. असं असलं तरीही आपल्या पक्षाकडे पुरेसं संख्याबळ असल्याने आपल्या पक्षाच्या उमेदवार प्रज्ञा सातव या जिंकून येतील, असा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला आहे.

“विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत आम्हाला माहिती आहे की, आमचे तीन-चार लोकं हे फुटणार आहेत. त्यानुसार आम्ही आमची रणनीती आखलेली आहे. आम्हाला माहिती आहे की, आमच्या उमेदवाराला कोणताही दगाफटका होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे. महाविकास आघाडीबद्दल आज ठरवणार आहोत. आमचे जे दोन-तीन लोकं आहेत, कुणाचा बाप राष्ट्रवादीत गेला, कुणाचा नवरा राष्ट्रवादीत आहे, एक टोपीवाला कधी इकडे असतो तर कधी तिकडे असतो. तर एक नांदेडवाला आहे. या चारही जणांचं कसं करायचं ते आम्ही ठरवणार आहोत. आम्हाला जे चार दिसत आहेत त्यांचे कान कसे टोचायचे ते आज रात्री ठरणार आहे आणि सर्व रणनीती आखणार आहोत”, अशी प्रतिक्रिया कैलास गोरंट्याल यांनी दिली.

‘फेस रिडींग करून सांगणार कोण काँग्रेसला मतदान करणार’

“जसं आमच्याकडे नाराजी आहे तसं सत्ताधारी पक्षांमध्येदेखील नाराजी आहे. तसं नसतं तर त्यांनी हॉटेल पॉलिटिक्स केलं नसतं. दोन्ही पक्ष हॉटेल पॉलिटिक्स का करतात? कारण दोन्ही आमदार फुटू नये”, असा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला. “उद्या सकाळी लाईन लागल्यानंतर माहिती पडेल. उद्या फेस रिडींग करून सांगणार कोण काँग्रेसला मतदान करणार आणि कोण फुटणार”, असंदेखील वक्तव्य कैलास गोरंट्याल यांनी केलं.

‘आमच्याकडे आता लाईन लागली’

“येणारा दिवस काँग्रेसचा आहे. आम्ही शंभर टक्के निवडून येणार आहोत. काँग्रेस काय होती आणि काय झाली ते तुम्हाला माहिती आहे. काँग्रेसमध्ये लोकं तिकीट मागायला येत नव्हते. पण आता ताकदवान झाली आहे. त्यावेळला तुफान कर रहा था मेरे अज्म का ख्वाब, की दुनिया समझ रही थी मेरी कश्ती डूब गई. म्हणजे लोकांना वाटत होतं की, काँग्रेस संपली आहे. पण काँग्रेसच्या आजूबाजूला जे सागर होते ते प्रेमाने फिरत होते आणि नतमस्तक होते. आमच्याकडे आता लाईन लागली आहे”, असा दावा कैलास गोरंट्याल यांनी केला.

Non Stop LIVE Update
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'अमित शाह यांची पवारांवरील टिका...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद
जगबुडी नदीच्या पुलाला तडा गेला, टीव्ही 9 मराठीच्या बातमीनंतर लेन बंद.
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह
'मैं बनिए का बेटा हू गॅरंटीशिवाय...., ' काय म्हणाले अमित शाह.
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाह यांनी जहरी टिका.
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले
स्वत: चं पाप दुसऱ्यावर टाकणं हीच भाजपाची मानसिकता - नाना पटोले.
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी
चंद्रपूरातील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने 100 ते 150 घरांत पाणी.
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार
'मी शरद पवार यांचा अपमान करुच..,' काय म्हणाले अजितदादा पवार.
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान
घाटकोपर भटवाडी कातोडीपाडा भागात दरड कोसळली, घरांचे मोठे नुकसान.
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर
'गुलाबी स्वप्नं दादांनी आधीच...,' काय म्हणाल्या रुपाली चाकणकर.
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड
'तर मी आणि दरेकर राजीनामा द्यायला तयार,पण जरांगे यांनी..,' प्रसाद लाड.