आधी जितेंद्र आव्हाड, आता त्यांच्यासोबतचे 13 जण होम क्वारंटाईन

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे स्वत: होम क्वारंटाईन असताना, आता त्यांच्यासोबतच्या 13 जणांना देखील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Colleague of Jitendra Awhad Home quarantine).

आधी जितेंद्र आव्हाड, आता त्यांच्यासोबतचे 13 जण होम क्वारंटाईन
Follow us
| Updated on: Apr 13, 2020 | 8:18 PM

मुंबई : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे स्वत: होम क्वारंटाईन असताना, आता त्यांच्यासोबतच्या 13 जणांना देखील कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे (Colleague of Jitendra Awhad Home quarantine). यामध्ये आव्हाडांचा ड्रायव्हर, अंगरक्षक आणि एका माजी नगरसेवकाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला ‘क्वारंटाइन’ केलं आहे. ‘कोरोना’ग्रस्त पोलिसाशी संपर्कात आल्यामुळे आव्हाड यांनी ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचा पर्याय स्वीकारला आहे. याबाबत त्यांनी स्वत:च ट्विट करुन माहिती दिली होती.

जितेंद्र आव्हाड यांचा ड्रायव्हर, अंगरक्षक आणि मुंब्र्याचे एक माजी नगरसेवक यांना कोरोनाचा संसर्गाचा धोका लक्षात घेता घरीच विलगीकरणात ठेवलं आहे. त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला की नाही हे आता कोरोना चाचणीनंतरच स्पष्ट होणार आहे. जितेंद्र आव्हाड मागील अनेक दिवसांपासून नागरिकांनाच्या मदतकार्यात सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत त्यांचे अनेक सहकारी देखील होते. त्यामुळे त्यांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. हीच शक्यता लक्षात घेऊन या सर्वांना होम क्वारंटाईन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जितेंद्र आव्हाडांची टेस्ट निगेटिव्ह

मंत्री जितेंद्र आव्हाड हे मुंब्र्यातील ‘कोरोना’ पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आले होते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरात ‘सेल्फ क्वारंटाइन’ होण्याचा निर्णय घेतला आहे. आव्हाड यांची टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील मंत्र्याने खबरदारीसाठी ‘सेल्फ क्वारंटाइन करण्याची ही पहिली वेळ असेल.

गेल्याच आठवड्यात जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कळवा मुंब्रा मतदारसंघात जाऊन नागरिकांना घरी बसण्यास बजावलं होतं. जीवाशी खेळू नका, घराबाहेर पडाल, तर 14 दिवस तुरुंगात पाठवण्याची तरतूद केली आहे, अशी ताकीदच त्यांनी दिली होती.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

पिंपरीत मुलगा 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर, लॉकडाऊनमध्ये पोलिस पित्याचा संघर्ष

MPSC-UPSC विद्यार्थ्यांना दिलासा, यंदा वयोमर्यादा ओलांडणाऱ्यांना आणखी 1 वर्ष संधी मिळणार?

ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल

इथे ओशाळला मृत्यू, ‘कोरोना’च्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाने प्राण सोडले

भाटिया रुग्णालयातील 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, वॉकहार्ट, शुश्रुषा, जसलोकनंतर भाटिया रुग्णालयही सील

Colleague of Jitendra Awhad Home quarantine

Non Stop LIVE Update
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात
मोदींवरील त्या वक्तव्यावर नवनीत राणांचं स्पष्टीकरण, विरोधकांवर घणाघात.
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला
मशाल आहे की आईस्क्रीमचा..., भाजपच्या बड्या नेत्याची ठाकरे गटाला टोला.
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला
सासूचे 4 दिवस संपले, आता सूनेचे दिवस...,दादांचा शरद पवारांना खोचक टोला.
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका
गद्दारी करणाऱ्यांना... ओमराजे निंबाळकरांची शिंदेंच्या खासदारावर टीका.
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु
खासदाराच्या प्रचारसभेत आमदाराला आली चक्कर, रुग्णालयात उपचार सुरु.
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर....
काँग्रेसचा जाहीरनामा मुस्लिमांना प्राधान्य देणारा? भाजपच्या टीकेवर.....
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा...
राणेंच्या उमेदवारीवरून धाकधूक, नितेश राणेंचं वक्तव्य; एक दिवस थांबा....
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात
नरेंद्र मोदी खोटारडे... त्यांच्या घोषणा भपंक, राऊतांचा मोदींवर घणाघात.
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?
घड्याळ चिन्हाचं प्रकरण न्यायप्रविष्ट, दादांच्या जाहिरातीत काय म्हटलंय?.
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.