AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंपरीत मुलगा 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर, लॉकडाऊनमध्ये पोलिस पित्याचा संघर्ष

अनेक पोलिस आपल्या कुटुंबातील दुःख बाजूला ठेवून आपलं कर्तव्य बजावत आहेत. असंच एक उदाहरण पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे (Police employee protecting family with duty amid Corona).

पिंपरीत मुलगा 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर, लॉकडाऊनमध्ये पोलिस पित्याचा संघर्ष
| Updated on: Apr 13, 2020 | 5:18 PM
Share

पुणे : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जसा वाढत आहे तसतसा आरोग्य यंत्रणा असो की पोलिस यंत्रणा त्यांचा ताण अधिकच वाढत चालला आहे. असंख्य पोलिस अहोरात्र या कोरोना विषाणूच्या विरुद्ध लढाईमध्ये सहभागी आहेत. त्यातील अनेक पोलिस आपल्या कुटुंबातील दुःख बाजूला ठेवून आपलं कर्तव्य बजावत आहेत. असंच एक उदाहरण पिंपरी-चिंचवडमध्ये पाहायला मिळत आहे (Police employee protecting family with duty amid Corona). संबंधित पोलिस कर्मचार्‍याचा मुलगा गेल्या 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवर आहे. असं असलं तरी हा कर्मचारी आपलं दररोजचं पोलिस बंदोबस्ताचं कर्तव्य पूर्ण करुन मुलाचा जीव वाचवण्यासाठी संघर्ष करत आहे. दत्तात्रय कांबळे असं या पोलिस कर्मचाऱ्याचं नाव आहे.

दत्तात्रय कांबळे हे सध्या पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशन या ठिकाणी कार्यरत आहेत. मात्र, त्यांना सध्या दुहेरी कर्तव्य बजावावं लागत आहे. एकीकडे आपल्या देशाप्रति असलेलं कर्तव्य बजावत असतानाच ते एक बाप म्हणून मुलाचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यांचा 27 वर्षीय मुलगा अक्षय कांबळे हा मृत्यूशी झुंज देत आहे. बाहेर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असताना देखील ते आपले दोन्ही कर्तव्यं बजावताना दिसत आहे. त्यांना लॉकडाऊनची प्रभावी अंमलबजावणी होऊन कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दररोज असंख्य लोकांच्या समोर जावं लागत आहे. अशा स्थितीत त्यांचा स्वतःचा जीव देखील धोक्यात येण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीमध्ये त्यांना आपल्यामुळे आपल्या कुटुंबीयांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची भीतीही सतावत असते.

दत्तात्रय कांबळे यांना दोन मुले आहेत. यातील त्यांचा लहान मुलगा अशिषचा 12 वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. स्नायूंच्या आजाराने त्याचा जीव घेतला. आता हाच आजार त्यांचा दुसरा एकुलता एक मुलगा अक्षयला जडला आहे. त्यामुळेच तो गेल्या 9 महिन्यांपासून व्हेंटिलेटरवरच आहे. दत्तात्रय कांबळे रोज सकाळी आपल्या कर्तव्यावर हजर झाल्यावर सामान्यांना कोरोनापासून कोसो दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. तर घरी गेल्यावर आपल्या मुलाचा जीव वाचण्यासाठी ते झटताना दिसतात. हे पाहून त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील त्यांचा हेवा वाटत आहे. पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र जाधव यांनी देखील कांबळे यांच्या या कणखरपणाचं आणि लढावूवृत्तीचं कौतुक केलं आहे.

एकूण सध्या संपूर्ण पोलिस दल एकीकडे देश आणि दुसरीकडे आपला परिवार या विवंचनेमध्ये अडकलेलं दिसत आहे. या संकटाला बाजूला ठेवून जनतेसाठी झटणारा पोलिस आपल्याला पाहायला मिळत आहे. 24 तास ते रस्त्यावर आपलं कर्तव्य बजावताना दिसतात आहेत. मात्र हे सगळं होत असताना जनता मात्र या लॉकडाऊनकडे कानाडोळा करत सर्वत्र फिरताना दिसत आहे. त्यामुळे पोलिसांचा हा दुहेरी संघर्ष लक्षात घेऊन किमान नागरिकांनी घरी बसण्याचा शहाणपणा दाखवावा इतकीच अपेक्षा पोलिस कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

संबंधित बातम्या :

ऑटिझमग्रस्त मुलासाठी सांडणीच्या दुधाची गरज, मातेची मोदींना हाक, राजस्थानवरुन मुंबईत दूध दाखल

इथे ओशाळला मृत्यू, ‘कोरोना’च्या संशयातून शेजाऱ्यांनी मदत नाकारली, हार्ट अटॅक आलेल्या वृद्धाने प्राण सोडले

भाटिया रुग्णालयातील 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह, वॉकहार्ट, शुश्रुषा, जसलोकनंतर भाटिया रुग्णालयही सील

Police employee protecting family with duty amid Corona

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.