AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Cyclone in Mumbai: मुंबईत डेंजर वारा, पावसाचा मारा, विमान-लोकल सेवा ठप्प, राज्यात 6 जण दगावले; धोका अजून कायम!

मुंबईत कालपासूनच तौक्ते चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. आज पहाटेपासूनच प्रचंड वारा आणि त्याचबरोबर तुफान पाऊस सुरू झाल्याने अवघ्या काही तासातच मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. (Cyclone Tauktae lashes Mumbai coast, drenches city)

Cyclone in Mumbai: मुंबईत डेंजर वारा, पावसाचा मारा, विमान-लोकल सेवा ठप्प, राज्यात 6 जण दगावले; धोका अजून कायम!
Cyclone in Mumbai
| Updated on: May 17, 2021 | 6:46 PM
Share

मुंबई: मुंबईत कालपासूनच तौक्ते चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. आज पहाटेपासूनच प्रचंड वारा आणि त्याचबरोबर तुफान पाऊस सुरू झाल्याने अवघ्या काही तासातच मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालं. ढगाळ वातावरण आणि पावसाचे पाणी भरू लागल्याने लोकल सेवा ठप्प केली. वादळामुळे विमान सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. तसेच सकाळपासून रौद्ररुप धारण केलेल्या वादळामुळे राज्यात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी आहेत. मुंबईवरील वादळाचा धोका अजून टळलेला नसल्याने मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. (Cyclone Tauktae lashes Mumbai coast, drenches city)

मुंबईत आज ताशी 114 किलोमीटर वेगाने वारे वाहत आहेत. आज दिवसभरातील हे सर्वात मोठं आणि भयंकर असं वादळ आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी घरांची आणि झाडांची पडझड झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साचले आहे. कोणताही अनर्थ ओढवू नये म्हणून मुंबईत एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. मुंबईत एनडीआरएफच्या तीन टीम तैनात असून राज्यभरात एकूण 12 टीम तैनात आहेत.

सहा जण दगावले

चक्रीवादळामुळे राज्यभरात झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आज दिवसभरात 6 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण जखमी आहेत. तसेच राज्यात 2 हजार 542 घरांची अंशतः तर 6 हजार घरांची पूर्ण पडझड झाली आहे.

ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहणार

मुंबईत येत्या काही तासांत ताशी 120 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्रातील काही भागात मुसळधार पाऊस होणार असल्याने सतर्कतेचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रचंड वेगाने वारे वाहणार असल्याने वांद्रे-वरळी सी-लिंक बंद करण्यात आला आहे. तसेच प्रशासनाने नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे. वादळामुळे प्रभावित झालेल्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवता यावे म्हणून मुंबईत 5 ठिकाणी शेल्टर होम बनविण्यात आले आहेत. तसेच एनडीआरएफच्या तीन टीमसह फायर ब्रिगेडच्या सहा टीमही तैनात करण्यात आल्या आहेत.

मोनोरेल बंद, लोकल ठप्प, विमानसेवा बंद

मुंबईत 11 तासांसाठी विमान सेवा बंद करण्यात आली आहे. तसेच सकाळी काही फ्लाईटस डायव्हर्ट करण्यात आले होते. त्याशिवाय मोनोरेल सेवाही बंद ठेवण्यात आली आहे. तर, अनेक ठिकाणी रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे.

दिवसभर काय घडलं?

>> राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज मुंबई महापालिकेत येऊन चक्रीवादळाच्या तयारीचा आढावा घेतला. तसेच सर्वांनी सतर्क राहण्याचा इशाराही दिला. मुंबईत पाणी भरू नये याकडे आम्ही लक्ष देत आहोत. या पूर्वी असं वादळ पाहिलं नाही. वित्त आणि जीवित हानी होणार नाही याकडे आमचं लक्ष आहे. या आपत्तीतून बाहेर पडण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र मिळून काम केलं पाहिजे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

>> जोराच्या वाऱ्यामुळे घाटकोपर-विक्रोळी दरम्यान लोकलवर झाडाची फांदी पडली. त्यामुळे रेल्वे सेवा बाधित झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी लोकल थांबवण्यात आल्या आहेत.

>> मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीतही प्रचंड वेगाने वारे वाहत आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले असून रस्त्यांवरही पाणी साचले आहे. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले आहेत. मुंबईतील गेट वे ऑफ इंडियासमोरील रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

>> हवामान खात्याने राज्यात ऑरेंज अॅलर्ट जारी केला आहे. वादळामुळे परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी लगत एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत. लोकांना किनारपट्टीपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. (Cyclone Tauktae lashes Mumbai coast, drenches city)

संबंधित बातम्या:

Cyclone in Maharashtra : तौक्ते चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करुन नुकसानभरपाई द्या; नसीम खान यांचं मुख्यमंत्र्यांना पत्रं

Photo Story: ‘तौक्ते’चा तडाखा, मुंबईत दोन तासात 132 झाडे पडली, सी-लिंक बंद; विमानांचे उड्डाणही थांबवले

Mumbai Rain and Cyclone Tauktae : मुंबईत कधीही न झालेलं वादळ, आढावा घेण्यासाठी आदित्य ठाकरे कंट्रोल रुममध्ये

(Cyclone Tauktae lashes Mumbai coast, drenches city)

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक