AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वांद्रे किल्ल्यावर दारुपार्टी, अखिल चित्रेंकडून Video पोस्ट; ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती.. भाजपवर टीका

मुंबईतील वांद्रे इथल्या किल्ल्यावर परवानगी घेऊन दारुपार्टी सुरू असल्याचा आरोप अखिल चित्रेंनी केला आहे. यासंदर्भातील एक व्हिडीओ त्यांनी एक्स अकाऊंटवर पोस्ट केला आहे. तर ऐतिहासिक वास्तूवर दारुपार्टीची परवानगी मिळतेच कशी, असा सवाल वडेट्टीवारांनी केला आहे.

वांद्रे किल्ल्यावर दारुपार्टी, अखिल चित्रेंकडून Video पोस्ट; ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती.. भाजपवर टीका
वांद्रे किल्ल्यावर दारुची पार्टीImage Credit source: Twitter
| Updated on: Nov 16, 2025 | 12:29 PM
Share

मुंबईतील वांद्रे इथल्या किल्ल्यावर दारूपार्टी सुरू असल्याचा व्हिडीओ शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट केला आहे. महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे, असा सवाल करत त्यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये वांद्रे किल्ल्यावर जंगी दारूपार्टी होत असल्याचं पहायला मिळतंय. आश्चर्याची बाब म्हणजे किल्ल्यावरील या दारू पार्टीचे संयोजक  ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग असल्याचं त्यांनी म्हटलंय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. तर ऐतिहासिक वास्तूवर दारूपार्टीला परवानगी मिळतेय कशी, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. संंबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

अखिल चित्रे यांची पोस्ट-

‘महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरु आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या आणि नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या वांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मुंबई महानगरपालिका परवानगी देतंच कसं? आणि किल्ल्यावरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण तर ‘महाराष्ट्र पर्यटन’ विभाग? नक्की काय सुरु आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सो कॉल्ड ‘सांस्कृतिक मंत्री’ आशिष कुरेशी,’ असा सवाल चित्रे यांनी केला आहे.

‘सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातील इतर किल्ल्यांवर करायचे, हेच भाजपा आणि त्यांच्या नोकरपक्षांचं ढोंगी हिंदुत्व अन् लबाड संस्कृती,’ अशी टीका त्यांनी केली आहे. हा व्हिडिओ स्थानिक रहिवाशांनी रविवारी रात्री उशिरा, 16 नोव्हेंबरच्या मध्यरात्री काढलेला असल्याचंही त्यांनी पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केलं आहे.

“किल्ल्यावर दारुपार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अती झालंय. ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं, हा त्यामागचा उद्देश दिसतोय. तुम्ही परवानगी देताच कशी? ज्या अधिकाऱ्यांनी या दारुपार्टीला परवानगी दिली, त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे. उत्पादन शुल्क विभागाने लाच घेऊन ही परवानगी दिली आहे. पवित्र स्थळाचं पावित्र्य घालवण्याचं पाप त्यांनी केलं”, असा आरोप वडेट्टीवारांनी केला आहे. तर सार्वजनिक ठिकाणी अशा गोष्टी होत असतील तर कारवाई होईल, असं अमित साटम यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...